उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणे खाऊन कंटाळा (make)आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये राजगिरा रताळ्याची पुरी बनवू शकता.

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. याशिवाय महिलांसह पुरुषसुद्धा उपवास करतात. देवीची घटस्थापना झाल्यानंतर नऊ दिवस घरात वेगवेगळे (make)गोड पदार्थ बनवले जातात. याशिवाय उपवासाचे काही ठराविक पदार्थ बनवून नाश्ता आणि संध्याकाळचा आहार घेतला जातो. उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणे खाल्ले जातात. पण वारंवार साबुदाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. उपवासाच्या दिवशी उपाशी पोटी साबुदाणे खाल्यामुळे शरीरात पित्ताचे प्रमाण वाढू लागते. शरीरात वाढलेल्या पित्तामुळे अपचन, गॅस किंवा उलट्या मळमळ होते. ही समस्या उद्भवू नये म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये राजगिरा रताळ्याची पुरी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बटाट्याच्या भाजीसोबत किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया राजगिरा रताळ्याची पुरी बनवण्याची रेसिपी.
साहित्य:
राजगिरा पीठ
रताळ
कोथिंबीर
जिऱ्याची पावडर
हिरवी मिरची पेस्ट
मीठ
तूप
तेल
पाणी
कृती:
राजगिरा रताळ्याची पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात रताळी स्वच्छ धुवून पाणी टाकून शिजवून घ्या.
शिजलेल्या रताळ्याची साल काढून रताळी मॅश करा. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरेपूड, हिरव्या मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ, साजूक तूप घालून सर्व साहित्य हाताने मिक्स करा.
त्यानंतर त्यात राजगिऱ्याचे पीठ आणि आवश्यकता वाटल्यास पाणी घालून पीठ मिक्स करा. तयार केलेले पीठ काहीवेळ बाजूला ठेवून घ्या.
तयार केलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्या आणि कढईमधील गरम तेलात मंद आचेवर पुऱ्या दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली राजगिरा रताळ्याची पुरी. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.
हेही वाचा :
डोके शांत असेल तर हृदय देखील चांगले राहते,
राज्यावरील संकट कायम, या 10 जिल्ह्यांना थेट इशारा,
स्पर्धेतील संपूर्ण Match Fees सैन्य दल-पहलगाम हल्ल्यातील कुटुंबियांना,