भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी (important)कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. दिल्ली आणि ओटावाच्या माध्यमातून उच्चायुक्तांच्या नियुक्तीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

ओट्टावा : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून संबंध दृढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री (important)अनिता आनंद यांची भेट घेतली. दिल्ली आणि ओटावाच्या माध्यमातून उच्चायुक्तांच्या नियुक्तीला दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी एक स्वागतयोग्य पाऊल म्हणून वर्णन केले.
जयशंकर यांनी ‘एक्स’वर याबाबत पोस्ट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी ‘न्यूयॉर्कमध्ये कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांच्याशी चांगली बैठक झाली. दोन्ही देशांतील संबंध पुन्हा निर्माण करताना उच्चायुक्तांच्या नियुक्तीचे स्वागत आहे. या संदर्भात आम्ही पुढील पावलांवर चर्चा केली. मंत्री अनिता आनंद यांचे भारतात स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत’. ऑगस्टमध्ये, भारताने दिनेश पटनायक यांची कॅनडामधील भारताच्या पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती जाहीर केली. गेल्या आठवड्यात पटनायक यांनी कॅनडाच्या गव्हर्नर जनरल मेरी सायमन यांना त्यांची पत्रे सादर केली. त्यानंतर आता ते त्यांच्या पदभार स्वीकारताना दिसत आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात, भारत आणि कॅनडाने एकमेकांच्या राजधानींमध्ये उच्चायुक्तांची नियुक्ती केली. ताणलेल्या संबंधांनंतर भारताने गेल्या वर्षी आपले उच्चायुक्त परत बोलावले होते. त्यानंतर भारतानेही कॅनेडियन राजदूतांनाही देशाबाहेर काढले होते. मात्र, या दोन्ही देशांतील संबंध सुधारताना दिसत आहे. त्यानुसार, आता वरिष्ठ पातळीवर भेटी घेतल्या जात आहे.
भारत-कॅनडातील संबंध तणावात
भारत आणि कॅनडाचे संबंध गेल्या काही काळात ताणले गेले होते. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिनी ट्रुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी खलिस्तान चवळीबाबत त्यांनी भारतविरोधी आक्रमक भूमिका स्वीकारली होती. यामुळे दोन्ही देशांत संबंधांमध्ये बिघाड झाला होता.
नव्या पंतप्रधानांची भूमिका सकारात्मक
कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी भारतासोबत मैत्री सुधारण्याची भूमिका स्वीकारली आहे. मात्र, यामुळे कॅनडातील खलिस्तानी नाराज झाल्याचे दिसून येत आहे. कट्टर खलिस्तानी समर्थक संस्था शीख फॉर जस्टिसने भारताविरोधात युद्ध पुकारले आहे. त्यांनी व्हॅंकुव्हरमधील भारतीय दूतावास ताब्यात घेण्याची धमकी दिली आहे.
हेही वाचा :
तमन्ना एवढी फिट आणि सुंदर कशी,
नेपाळकडून विंडीजचा सलग दुसऱ्या सामन्यात धुव्वा,
7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत ‘हे’ 32 इंचाचे स्मार्ट टीव्ही,