मोठी बातमी! गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सार्वजनिक मंडळांमध्ये तर गणेशोत्सवासाठी लगबग सुरु झाली(declared)असून, मूर्तीकारही गणेशमूर्ती तयार करण्यात व्यग्र आहेत. तसंच घरच्या गणपतीची मूर्ती निवडण्यासाठी बाजारांमध्ये नागरिकांची लगबग सुरु झाली आहे. यादरम्यान गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आली आहे. गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित केला आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे.भाजपाचे कसबा पेठचे आमदार नारायण रासने यांनी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना आशिष शेलार यांनी रासने यांचे आभार मानले. पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्राचा गणेशोत्सव 1893 रोजी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरित्या सुरु केला. घऱोघरी तो सुरु होताच. त्याची एक पार्श्वभूमी सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित होतं आणि त्याच पद्धतीन चालू आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव उत्सव म्हणून घोषित करेल हे मी आजच स्पष्ट करतो”.

पुढे ते म्हणाले, “त्यांनी निर्बंधांचा उल्लेख केला. काही लोकांनी वेगवेगळ्या कारणाने गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या न्यायालयात केला. पण महायुतीच्या सरकारने या सर्व निर्बंधांना, या सर्व स्पीड ब्रेकरला बाजूला करण्याचे काम केलं. (declared)मी न्यायाधीशाचं नाव घेणार नाही, ते निवृत्त झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून झालेल्या निवाड्यात जणू पोलिसांनी, महापालिकांनी परवानगीच देऊ नये यासाठी प्रयत्न सुरु होता”. रस्ते, मैदानं, नागरी वस्त्या निर्मित होण्याऐवजी तिथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होत होते. तरीही ती कारणं देत तिथे आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला असाही दावा त्यांनी केला.पीओपीच्या परंपरागत मूर्तींवर बंदी आणताना सीपीसीबीच्या गाईडलाईन्सचा तत्कालीन सरकारच्या काळातल्या सरकारने बाऊ केला गेला. त्यानंतर पीओपी मूर्तीच्या बाबतीमध्ये पर्यावरण पूरक अन्य पर्यायांना समोर ठेवून पीओपी पर्यावरणाला घातक आहे की नाही, या विषयावर सखोल अभ्यास करण्याची भूमिका आमच्या विभागाने घेतली. आणि राजीव गांधी विज्ञान आयोगामार्फत काकोडकर समितीचा अहवाल घेतला. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी यांनी संमती दिली आणि जे निर्बंध होते तेही बाजूला निघाले. न्यायालयाच्या निवाड्यानुसार पीओपी मूर्ती बनवणे, डिस्प्ले करणे आणि विकणे यालाही परवानगी मिळाली असंही त्यांनी सांगितलं.

आपल्या गणेशोत्सवाच्या बाबतीत महायूती सरकारने भूमिका घेतली असून पोलीस सुरक्षा असेल, आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च असेल, कसबामध्ये आणि विशेषता पुण्यातला महोत्सव असेल मुंबईतला असेल, पूर्ण राज्यातला असेल त्यासाठी लागतील तेवढा निधी राज्य सरकार खर्च करेल. (declared)कारण गणेशोत्सव उत्साहाने साजरा करणे ही महायुतीची आणि या शासनाची भूमिका आहे. सर्व गणेशोत्सव मंडळांना यानिमित्ताने माझी विनंती आहे की आपण जे वेगवेगळे देखावे करतात त्यामध्ये आपले सैन्य,सैनिक, सामाजिक उपक्रम, ऑपरेशन सिंदूर, देशांतर्गत विकासाची कामे, आपले महापुरुष अशा सगळ्या गोष्टींच्या विचार करावा. सामाजिक भान, पर्यावरणपूरक आणि उत्साहात साजरा होणारा हा गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित करताना आम्हाला आनंद होतो आहे, असे निवेदन त्यांनी केले.

हेही वाचा :