तमन्ना भाटियाला आज संपूर्ण जग ओळखते. तिच्या (beauty)सौंदर्यावर तरुण फिदा आहेत. ती एवढी फिट आणि सुंदर कशी दिसते असे विचारले जाते. आता तिच्याच फिटनेस ट्रेनरने शरीरातील उर्जा कायम ठेवण्यासाठी काय करायला हवे, हे सांगितले आहे.

बॉलिवुड आणि दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीत आपल्या (beauty)नावाचं वलय निर्माण करणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाला आज फक्त भरतच नव्हे तर संपूर्ण जग ओळखते. तिच्या सौंदर्यावर आज कोट्यवधी तरुण फिदा आहेत.
तिच्या सौंदर्याचं रहस्य नेमकं काय आहे? ती एवढी फीट नेमकी कशी राहते? असं नेहमीच विचारलं जातं. आता तमन्ना भाटियाच्या फिटनेस ट्रेनरनेच तंदरुस्त राहण्याचं सिक्रेट सांगितलं आहे. पाच पदार्थ खाल्ली तर तुमच्यातील उर्जा कायम राहू शकते असं या फिटनेस ट्रेनरने सांगितले आहे.
फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ सिंह हा तमन्ना भाटियाला फिटनेससंदर्भात सल्ले देतो. त्यानेच शरीरातील उर्जा कायम ठेवण्यासाठी पाच गोष्टी खाण्याचा सल्ला दिला आहे. यात काही फळं तसेच खाद्यपदार्थांचा समावेश आहे.
शरीरातील उर्जा कायम ठेवण्यासाठी ओट्स खायला हवेत, असे सिद्धार्थने सांगितले आहे. सोबतच त्याने आहारात अंडी असावीत असंही त्याने म्हटले आहे. अंड्यामध्ये प्रोटिन असते. तसेच ब जीवनसत्वदेखील असते. त्यामुळे आहारात अंडे असावे असे त्याने सांगितले आहे.
शरीरातील उर्जा कया राहावी यासाठी आहारात दही असावे असेही त्याने सांगितले आहे. तसेच करवंद हेदेखील शरीरातील उर्जा कायम ठेवण्यास उपयोगी असल्याचे सिद्धार्थ सिंहने सांगितले आहे.
हेही वाचा :
कुलदीप यादवची ऐतिहासिक कामगिरी,
भारतातील प्रत्येक शहरात पेट्रोलचा दर वेगवेगळा का आहे?
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या!