तुम्ही तुमच्या बजेटमध्ये स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार (TV)करत असाल, तर Amazon Great Indian Festival 2025 सेल ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. कारण या सेलमध्ये तुम्हाला 32-इंच स्मार्ट टीव्ही मोठ्या सवलतीत मिळत आहेत. चला जाणून घेऊयात…

अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2025 मध्ये ग्राहकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या सेलमध्ये 32 इंचाच्या स्मार्ट टीव्हीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. (TV)आता तुम्ही 7,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. हे टीव्ही कॉम्पॅक्ट स्पेस किंवा सेकंडरी सेटअपसाठी परिपूर्ण आहेत आणि एचडी डिस्प्ले, स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि आवाजाची क्वॉलिटी यासारख्या फिचर्ससह तुम्हाला स्मार्ट टिव्ही खरेदी करता येणार आहे. चला तर मग आजच्या या लेखात आपण 5 उत्तम डीलबद्दल जाणून घेऊयात…

व्हीडब्ल्यू 80 सेमी प्लेवॉल फ्रेमलेस सिरीज VW32F5

VW चा हा 32-इंचाचा टीव्ही HD रेडी डिस्प्ले, 24W स्टीरिओ साउंड आणि फ्रेमलेस डिझाइनसह येतो. हा टीव्ही अँड्रॉइड-आधारित स्मार्ट फीचर्स आणि OTT अॅप्ससाठी सपोर्ट देण्यात आलेला आहे. कॉम्पॅक्ट घरे किंवा पहिल्यांदाच स्मार्ट टीव्ही खरेदी करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हा स्मार्ट टिव्ही Amazon वर 6,999 रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे .

एसर जी प्लस 32 जीबी गुगल टीव्ही

एसर जी प्लस गुगल टीव्हीमध्ये HDR10 डिस्प्ले, Dolby Audio आणि ड्युअल-बँड वाय-फाय आहे. यात 1.5 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेज आहे, जे स्मुथ परफॉर्मेस देते. अमेझॉन सेल दरम्यान हा टीव्ही कुटुंबांसाठी एक उत्तम बजेट मनोरंजन पर्याय असल्याचे सिद्ध होत आहे. तर हा स्मार्ट टिव्ही तुम्हाला 9,999 रूपयांच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे.

सॅमसंग 80 सेमी एचडी रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही

सॅमसंगचा हा टीव्ही PurColor आणि Mega Contrast टेक्नॉलॉजीसह उत्कृष्ट पिक्चर क्वॉलिटी प्रदान करतो. Dolby Digital Plus साऊंड आणि स्क्रीन शेअरिंग सारख्या फिचर्समुळे हा टिव्ही एक प्रीमियम असून बजेट- फ्रेंडली पर्याय आहे. डबल पॅनल व्हॉरंटीसह हा स्मार्ट टिव्ही तुम्हाला 11,990 रूपयांना खरेदी करता येणार आहे.

एलजी 80 सेमी एलआर570 सिरीज,

LG च्या LR570 सिरीज टीव्हीमध्ये α5 Gen 6 प्रोसेसर आणि HDR10 सपोर्ट आहे. यात गेम ऑप्टिमायझर आणि AI साउंड आहे. वेबओएस प्लॅटफॉर्मवर चालणारा हा टीव्ही मध्यम श्रेणीतील खरेदीदारांसाठी एक उत्तम पर्याय आहे ज्यांचे डिझाइन स्टायलिश आहे आणि ब्रँडवर विश्वास ठेवण्यासारखे आहे. तर हा टिव्ही तुम्ही सवलतीत 12,490 रूपयांना खरेदी करू शकतात.

रेडमी शाओमी 80 सेमी एफ सिरीज एचडी रेडी

Xiaomi कंपनीचा Redmi हा टीव्ही Fire OS आणि Alexa सपोर्टसह येतो. यात 12,000+ अॅप्स, डॉल्बी ऑडिओ आणि DTS Virtual:X साउंड टेक्नॉलॉजी यातध्ये आहे. त्याची बेझल-लेस डिझाइन आणि ड्युअल-बँड वाय-फाय सपोर्टमुळे तो OTT कंटेंट प्रेमींमध्ये लोकप्रिय पर्याय बनलेला आहे. तर या स्मार्ट टिव्हीची किंमत 10,999 आहे.

हेही वाचा :

कुलदीप यादवची ऐतिहासिक कामगिरी, 

भारतातील प्रत्येक शहरात पेट्रोलचा दर वेगवेगळा का आहे?

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *