शरीरात निर्माण झालेली हिमोग्लोबिनची कमतरता (hemoglobin)शरीरात निर्माण झालेली हिमोग्लोबिनची कमतरता ()भरून काढण्यासाठी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी होईल. जाणून घ्या आहारात कोणत्या पदार्थांचे नियमित सेवन करावे.

दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराला सर्वच पोषक घटकांची कायमच आवश्यकता असते. पण आहारात सतत जंक फूड, तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे (hemoglobin)शरीराला हानी पोहचते. यासोबतच शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. लोहाची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. कधी डोकेदुखी तर कधी शरीरात थकवा, अशक्तपणा वाढू लागतो. ही समस्या प्रामुख्याने महिला आणि लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागल्यानंतर वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर शरीराला योग्य रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे थोडस चालल्यानंतर लगेच दम लागणे, थकवा वाटणे किंवा अंगात ताकद नसल्यासारखे वाटू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
बीट:
महिलांच्या आरोग्यासाठी बीट वरदान ठरते. शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी एक ग्लास बीटचा रस नियमित प्यावा. यामुळे नैसर्गिक लोह रक्तनिर्मितीला चालना देते. याशिवाय नियमित बीट खाल्यास रक्तभिसरण सुधारते, शरीरातील पेशींना ऑक्सिजन पुरवठा होण्यास मदत होते. याशिवाय आहारात तुम्ही बीटच्या भाजीचे, सॅलड किंवा बीटच्या सूपचे सेवन करू शकता. बीट खाल्यामुळे शरीरात ताजेपणा वाढतो आणि अशक्तपणा, थकवा कमी होण्यास मदत होते.
गूळ:
रोजच्या आहारात पारंपरिक पदार्थांचे सेवन करावे. गूळ खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. याशिवाय गोड पदार्थ बनवताना साखरेचा वापर करण्याऐवजी गुळाचा वापर करावा. मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी गुळाचे सेवन केल्यास रक्तातील साखर कायमच संतुलित राहील. गुळाचे सेवन केल्यामुळे शरीरातील अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. थंडीच्या दिवसांमध्ये गूळ खाल्यास शरीरात उष्णता वाढते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.
भोपळ्याच्या बिया:
लहान मुलांसह मोठ्यांना भोपळ्याची भाजी खायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे नियमित एक चमचा भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. भोपळ्याच्या बियांमध्ये लोहासोबतच मॅग्नेशियम आणि जस्त आढळून येते. सलाड, स्मूदी किंवा सूप इत्यादी कोणत्याही पदार्थामध्ये मिक्स करून तुम्ही भोपळ्याच्या बियांचे सेवन करू शकता.
हिरव्या पालेभाज्या:
शरीरात निर्माण झालेली रक्त आणि हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी हिरव्या पालेभाज्या नियमित खाव्यात. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात लोह मिळते. पालेभाज्यांमध्ये विटामिन सी आणि लोहाची पातळी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यामुळे आहारात तुम्ही पालक सूप, पालेभाज्या, सॅलड बनवून खाऊ शकता.
हेही वाचा :
तोंडाला सुटेल पाणी!
‘दिवाळीपूर्वी शेतकर्यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’;
राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा,