जेवणाच्या डब्यासाठी नेमकी काय भाजी बनवावी? (lunch)हे बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बटाटा वाटाण्याची भाजी बनवू शकता. हा पदार्थ कोणत्याही पदार्थासोबत तुम्ही खाऊ शकता.

सकाळी उठल्यानंतर प्रत्येकालाच घाई असते. घाईगडबडीच्या वेळी डब्यासाठी नेमकी काय भाजी बनवावी? हे बऱ्याचदा सुचत नाही. जेवणाच्या डब्यात कायमच ठराविक भाज्या (lunch)खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बटाटा वाटण्याची चमचमीत भाजी बनवू शकता. वाटण्याची भाजी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडते. ही भाजी तुम्ही गरमागरम चपाती, भात किंवा तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता.
साहित्य:
कांदा
लसूण
टोमॅटो
हिरवे वाटाणे
हिरवी मिरची
काळीमिरी
खडे मसाले
बटाटा
कढीपत्ता
जिरं
मोहरी
कोथिंबीर
कृती:
बटाटा वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये लसूण पाकळ्या, आलं आणि हिरवी मिरची भाजून घ्या. त्यानंतर त्यात थोडस खोबर टाकून हलकेसे भाजा.
मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले सर्व साहित्य टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाका आणि बारीक पेस्ट तयार करा.
कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा.
तेलामध्ये कांदा व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला टाकून व्यवस्थित भाजा. सर्व मसाले तेलात भाजून झाल्यानंतर त्यात तयार केलेली पेस्ट टाकून मिक्स करा.
नंतर त्यात शिजवून वाटाणे आणि बटाटा टाकून कोमट पाणी घाला. भाजी व्यवस्थित मंद आचेवर शिजल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली बटाटा वाटाण्याची भाजी. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.
हेही वाचा :
कमी बजेटमध्ये करा परदेश वारी,
सेडान खरेदी करण्याची उत्तम संधी,
भारत-कॅनडा संबंध पुन्हा होताहेत दृढ;