अकोल्यात बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.(opportunity)अकोल्यात सावत्र बापाने ५ वर्षीय मुलीवरच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या चिमुकलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर नराधम बापाला पोलिसांकडून अटक करण्यात आली. अकोल्यामधील या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील एका नराधम सावत्र बापाने स्वत:च्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. खदान पोलीस स्टेशन हद्दीतील हा संपूर्ण प्रकार घडला.

अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी आरोपी सावत्र बापाला काही तासांतच अटक केलीआई गरबा पाहण्यासाठी बाहेर गेली होती. (opportunity)याचीच संधी साधून सावत्र बापाने स्वत:च्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केला. पोट जास्त दुखू लागल्याने मुलीने आईला घरी परतल्यानंतर सर्व प्रकार सांगितला. आईने मुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आलाय.

पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी अत्याचार झाल्याची पुष्टी केली. (opportunity)या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी सावत्र बापावर तात्काळ कारवाई केली. आरोपीवर विविध कलमान्वये आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातर्गंत गुन्हा नोंदवण्यात आलाय.पीडित मुलीवर उपाचार करून तिचे समुपदेशनही करण्यात येत आहे. अकोला शहरातील या घटनेने परिसरात संतापाती लाट पसरली आहे. आरोपी सावत्र बापावर कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा :
तोंडाला सुटेल पाणी!
‘दिवाळीपूर्वी शेतकर्यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’;
राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा,