प्रत्येक जण आपापल्या आयुष्याची स्वपन पाहत असताना एक टप्पा असा येतो की आपल्याला चांगला जोडीदार हवा असतो. त्याच्या सोबत आपण सुखी संसाराची स्वप्न पाहत असतो. लग्न(marriage) होण्याचा सोहळा आनंद देणार असतो. मात्र लग्न झाल्याच्या काही तासातच आपल्या स्वप्नांवर पाणी फेरलं तर? तुम्ही विचार पण करणार नाहीत अशी धक्कादायक घटना ही किशनगड राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात घडली आहे. तुम्ही विचार करून थक्क व्हाल असच काहीस घडल आहे.

किसनगड मधील राकेश शर्मा आणि पूजा गुर्जर यांचं लग्न झालं. मोठ्या प्रयत्नानी लग्न(marriage) जुळल लग्न पण पार पडलं. लक्ष्मी म्हणून पूजाला घरी आणल. त्यांचा संसार सुरू झाला. मात्र सुहागरातच्या पहिल्या दिवशीच पूजाने राकेश समोर एक अट ठेवली. ती अट कल्पनेच्या पलीकडची होती. पूजा आणि राकेशला पहिल्या दिवशी आत पाठवून देण्यात आल. आमच्याकडे दोन तीन दिवस काही करत नाहीत ही परंपरा आहे अस तिने सांगितल. राकेश आणि घरच्यांना ही गोष्ट खटकली मात्र त्याकडे त्याने दुर्लक्ष केल, आणि घडला भलताच प्रकार !

पूजाने राकेशसमोर आमच्यात काही करत नाहीत ही अट ठेवली आणि रात्रीत घरातील शांतीत रोकड, दागिने घेवून ती पळून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात राकेशला ना मुलगी दिसली ना घरातील दागदागिने, सगळ काही लुटून पूजा फरार झाली.

पूजा आणि राकेशच लग्न हे एका जितनेद्र नायक या व्यक्तीने जुळवलं होत. त्यासाठी त्याने जवळपास २ लाख रुपये घेतले होते. जसपुरमध्ये त्यांनी आधी स्टँप मॅरियेज केल. मात्र लग्नाच्या १० दिवसातच पूजा राकेशला लुटून फरार झाली.

आता या प्रकरणात मदनगंज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. नवरी पूजाचा शोध हा घेतला जातोय. मात्र लग्न सारख्या प्रकारात पण जर गंडे घालण्याचे धंदे सुरू असतील तर हे समाजासाठी चांगल नाही. या घटनेने सगळ्यांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. फसवणूक आणि विश्वासघाताचे गंभीर प्रकरण आहे. पूजा आणि दलालावर कडक कारवाई करण्याची यातून मागणी केली जात आहे.

हेही वाचा :

राज्यातला पाऊस थांबणार कधी? अखेर हवामान विभागाने सांगितली तारीख

राम-रावणाच्या युद्धाशी दसऱ्याला गाडी धुण्याचा काय संबंध? 99% लोकांना खरं कारण माहिती नाही

विमानतळावर भीषण अपघात; दोन विमानांची जोरदार धडक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *