“बालिका वधू” मालिकेतील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली(actress) टीव्ही अभिनेत्री अविका गोर ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ती “पती, पत्नी और पंगा” या शोमध्ये तिचा बॉयफ्रेंड मिलिंद चांदवानीशी लग्न करणार आहे.

अविका गोर आणि मिलिंद चांदवानी लग्नासाठी सज्ज

टेलिव्हिजनवर होणार लग्न सोहळा पार

संगीत आणि हळदी समारंभांचे व्हिडिओ व्हायरल

“बालिका वधू” या टीव्ही मालिकेतील अभिनेत्री अविका गोर गेल्या काही काळापासून तिच्या लग्नाबद्दल चर्चेत आहे. ती सध्या “पती पत्नी और पंगा” या शोमध्ये दिसत आहे, जिथे तिने (actress) तिच्या लग्नाची घोषणा केली आहे. चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत, जो आज, ३० सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे. अविका लवकरच लग्न बंधनात अडकण्याची सज्ज झाली आहे. सेटवरून चमकदार लाल रंगाच्या पोशाखात वधूच्या वेशात असलेले तिचे फोटो समोर आले आहेत, ज्यामुळे तिची पहिली झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे.

“पती पत्नी और पंगा” या टीव्ही शोच्या सेटवरून अविका गोरच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये “बालिका वधू” अभिनेत्री वधू आणि तिचा दीर्घकालीन बॉयफ्रेंड मिलिंच चांदवानी वराच्या वेशात दिसत आहेत. शोमधील फोटोंमध्ये, अभिनेत्री चमकदार लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये दिसत आहे. तिने हलक्या मेकअपने तिचा लूक पूर्ण केला आहे. ती संपूर्ण लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

अविका गोरचा ब्राइडल लूक

अविका गोरच्या ब्राइडल लेहेंग्याबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीने हाताने बनवलेला भारी लेहेंगा परिधान केला आहे. तिने तिचा लूक जड नेकलेस, नोज रिंग, सिंदूर आणि न्यूड मेकअपने पूर्ण केला आहे. अभिनेत्रीच्या लग्नाची चमक तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तिला तिचे प्रेम मिळाल्याबद्दल ती खूप आनंदी दिसत होती. मिलिंदने गोल्डन नक्षीकाम असलेला क्रीम रंगाची शेरवानी घातली आहे. वधू-वर म्हणून हे जोडपे खूपच सुंदर दिसत आहे. या दोघांना चाहत्यांचे अनेक सेलेब्रिटी अभिनंदन करत आहेत.

संगीत आणि हळदी समारंभांचे व्हिडिओ व्हायरल

अविका गोरच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीने तिच्या संगीत समारंभात निळा लेहेंगा घातला होता. तिने तिच्या होणारा नवरा मालिंदसोबत नृत्य केले. याव्यतिरिक्त, अविकाच्या हळदी समारंभाचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. तिचे चाहते तिला वधू म्हणून पाहण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. तसेच आता अभिनेत्रीचे लवकरच लग्नाचेही फोटो व्हायरल होणार आहेत.

हेही वाचा :

PCOD चा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो खोलवर परिणाम?

महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ;

दिलासादायक ! आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार;

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *