बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींमध्ये चढाओढ सुरुच राहते. पण कामाच्याबाबतीत(actresses) तसेच मानधनाच्या बाबत काहीच अभिनेत्रींचे नाव चर्चेत असते जसं की दीपिका,ऐश्वर्या. या अभिनेत्री कामासोबतच त्यांच्या सौंदर्यासाठी देखील चर्चेत असतात. दीपिकाची तर ती घेत असलेल्या मानधनावरून नेहमीच चर्चा होताना दिसते. पण अशी एक अभिनेत्री आहे जी सैंदर्याच्या आणिमानधनाच्याबाबतीत दीपिका आणि ऐश्वर्यालाही टक्कर देते.तिने 50 सेकंदाच्या रोलसाठी चक्क 5 कोटी घेतले होते. तर ती सौंदर्याच्याबाबतीत टॉप अभिनेत्रींना देखील टक्कर देते. तब्बल 80 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

एवढंच नाही तर भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी ही अभिनेत्री ठरली आहे.(actresses) या अभिनेत्रीचे नाव आहे नयनतारा, जिने रजनीकांत, शाहरुख खान, जयराम, नागार्जुन अक्किनेनी आणि इतरांसोबत काम केले आहे.नयनतारा सध्या अभिनय जगात वर्चस्व गाजवत आहे. 2018 मध्ये फोर्ब्स इंडियाच्या “सेलिब्रिटी 100” यादीत समाविष्ट झालेली ती एकमेव आघाडीची साउथ अभिनेत्री होती. 20 वर्षांत तिने 80 चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत. एक काळ असा होता जेव्हा लोकांना वाटायचे की तिची कारकीर्द घसरत आहे. मात्र तिने त्यानंतर जोरदार पुनरागमन केले. अनेक चित्रपट निर्मात्यांनी तिला मोठ्या स्टार्ससोबत काम करण्याची संधी दिली.

नयनताराला सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री देखील म्हटले जाते. रिपोर्ट्सनुसार, नयनतारा प्रत्येक चित्रपटासाठी 10 कोटी घेते. तिचा शेवटचा चित्रपट “टेस्ट” होता. नेटफ्लिक्सने नयनतारा आणि विघ्नेश शिवनच्या लग्नाबद्दल “नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल” नावाचा एक डॉक्यूमेंट्री देखील प्रदर्शित केला.(actresses) एवढंच नाही तर एका कंपनीच्या जाहिरातीत काम करण्यासाठी तिला करारबद्ध करण्यात आले होते. तेव्हा अवघ्या 50 सेकंदांसाठी तिला 5 कोटी रुपये देण्यात आले होते.2015 मध्ये, “नानुम राउडी थान” या चित्रपटात काम करत असताना, तिची ओळख दिग्दर्शक विघ्नेश शिवनशी झाली. ते प्रेमात पडले. नंतर त्यांनी लग्न केले आणि सरोगेट आईच्या मदतीने त्यांना जुळी मुलेही झाली. तसेच 2023 मध्ये अभिनेत्री नयनताराने अभिनेता शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

हेही वाचा :

PCOD चा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो खोलवर परिणाम?

महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ;

दिलासादायक ! आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार;

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *