पुढील पाच दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असून, हवामान विभागाने (state)राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात गेल्या आठवड्यापासून धो धो कोसळणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरला असला तरी, अनेक भागात आजही पावसाचा अंदाज आहे. तीव्रता कमी झाली असली तरी, आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. बहुतांश जिल्ह्यामध्ये आज हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून मराठवाड्यातील नांदेडसह विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यात विशेषतः रायगड, रत्नागिरी, घाटमाथ्यावरील पुणे, सातारा आणि कोल्हापूर यांचा समावेश आहे.राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आता ओसरला असला तरी, (state)अनेक भागांमध्ये आजही पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. यासोबत विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. (state)या तिन्ही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत मध्यम ते हलका पाऊस असेल. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊन सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा :

PCOD चा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो खोलवर परिणाम?

महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ;

दिलासादायक ! आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार;

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *