सप्टेंबर महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस(rains) झाला. ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच पावसाने झाली आहे. आज दसऱ्याच्या दिवशीही वरुणराजा बरसणार आहे. तसा अलर्टच हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर केला आहे. मुंबईसह-पुण्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मान्सून हंगामात देशात 937.2 मिलिमीटर पावसाची(rains) नोंद झाली. वायव्य भारतात 27 टक्के, मध्य भारतात 15 टक्के तर दक्षिण भारतात 10 टक्के अधिक पाऊस पडला आहे. सप्टेंबर महिन्यात 115 टक्के पाऊस झाला असून राज्यात मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. ऑक्टोबर महिन्याची सुरुवातदेखील पावसाने झाली. आज दसऱ्यालादेखील विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाच्या प्रणालीमुळं पावसाला पोषक हवामान होत आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर, उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, 7 ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होणार असून सुमारे 8 ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची जोरदार शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हेही वाचा :
PCOD चा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो खोलवर परिणाम?
महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ;
दिलासादायक ! आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार;