अमेरिकेतील एका शाळेत नुकत्याच पार पडलेल्या बोर्ड मीटिंगमध्ये एका महिलेने गोंधळ घातला.(clothes) या महिलेने अचानक तिचे एक एक कपडे काढायला सुरुवात केली आणि फक्त बिकिनीवरच ती अधिकाऱ्यांना जाब विचारू लागली. ही घटना कॅलिफोर्नियामध्ये घडली. या मिटिंगमधील व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.न्यूयॉर्क पोस्टमधील एका वृत्तानुसार, बेथ बॉर्न असं या महिलेचे नाव आहे. या महिलेने याआधी देखील असेच गोंधळाचे वातावरण निर्माण केले होते. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या लॉकर रूम आणि वॉशरूमचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली या जिल्ह्याच्या धोरणाचा ही महिला निषेध करत होती. ही महिला मॉम्स फॉर लिबर्टी नावाच्या संस्थेची अध्यक्ष आहे. १८ सप्टेंबर रोजी या महिलेने डेव्हिस जॉइंट युनिफाइड स्कूल डिस्ट्रिक्ट बोर्डाच्या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीमध्ये प्रश्न उपस्थित करत असताना तिने हे धक्कादायक कृत्य केले. त्यामुळे मिटिंगमध्ये उपस्थित असलेले सर्वजण हैराण झाले.

बोर्ड मिटिंगमध्ये कपडे काढणारी महिला या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे केली, (clothes) ‘मी डेव्हिस युनिफाइड स्कूल डिस्ट्रिक्टमध्ये एका पदावर आहे आणि आज मी तुमच्याशी ज्युनियर हायस्कूलमधील लॉकर रूमसाठीच्या धोरणांबद्दल बोलण्यासाठी इथे आली आहे. एमर्सन, होम्स, हार्पर ज्युनियर हाय. आता आपण आपल्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण वर्गासाठी कपडे काढण्यासाठी सांगू. त्यामुळे मी तुम्हाला फक्त हे सांगते की जेव्हा कपडे काढले जातात तेव्हा कसे वाटते.’

या महिलेने पुढे सांगितले की, ‘मी माझे कपडे काढून फक्त हे दाखवून इच्छित होती (clothes) की सध्याच्या नियमांनुसार मुलींना किती असुरक्षित वाटू लागले आहे.’ या महिलेने कपडे काढायला सुरुवात करताच बोर्ड मिटिंगमध्ये एकच गोंधळ उडाला. सर्वांनी या महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने आपली पँट, शर्ट काढला आणि फक्त बिकिनीवरच भाषण देत राहिली. या गोंधळानंतर बोर्ड सदस्यांनी बैठक तहकूब केली.

हेही वाचा :

PCOD चा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो खोलवर परिणाम?

महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ;

दिलासादायक ! आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार;

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *