अमेरिकेत हिंदू मंदिरांना सतत लक्ष्य केले जात आहे.(vandalized)आता देखील इंडियानामध्ये एका हिंदू मंदिराचे नुकसान करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना १० ऑगस्ट रोजी ग्रीनवुड शहरातील स्वामीनारायण मंदिरात घडली. यानंतर शिकागोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेची गंभीर दखल घेतली आणि हे निंदनीय असल्याचे म्हटलं. तर एका निवेदनात, वाणिज्य दूतावासाने म्हटले आहे की मंदिराच्या मुख्य साइनबोर्डची मोडतोड करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरात उपद्रवींकडून घडणाऱ्या गैरकृत्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोस्टमध्ये म्हटले आहे की, “इंडियानाच्या ग्रीनवुडमधील BAPS स्वामीनारायण मंदिराच्या मुख्य साइनबोर्डची विटंबना निंदनीय आहे.” तसेच त्यांनी त्वरित कारवाईसाठी कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा उपस्थित केला आहे, असे म्हटले आहे. (vandalized)मंदिर संकुलाच्या भिंतींवर भारतविरोधी आणि हिंदूविरोधी घोषणाही लिहिण्यात आल्या होत्या. आता एस जयशंकरही रशियाला जाणार; भारत-अमेरिका ‘ट्रेड्र वॉर’मुळे दौऱ्याला विशेष महत्त्व!

एका वर्षापेक्षा कमी कालावधीत मंदिरावर हल्ला होण्याची ही चौथी वेळ आहे.(vandalized) ही घटना कृष्ण जन्माष्टमीच्या काही दिवस आधी घडली आहे. तर मार्चमध्ये, अमेरिकेत अशाच प्रकारच्या आणखी एका घटनेत, कॅलिफोर्नियातील बीएपीएस हिंदू मंदिराची अज्ञात व्यक्तीने विटंबना केली होती. त्यावेळी, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हे कृत्य घृणास्पद असल्याचे म्हटले होते आणि अमेरिकन कायदा अंमलबजावणी संस्थांना जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले होते.
हेही वाचा :
३ दिवस बँका राहणार बंद, कधी आणि कुठे?
कोकणात जाणाऱ्यांना बाप्पा पावला; मोफत प्रवास, जेवण अन्….
नवऱ्याने बायकोला झोपायला बोलावले अन्…