बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. कोकणात (Konkan)जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू आहे. गणेशोत्सव काळात रेल्वेचे तिकीट मिळणे म्हणजेच भाग्य म्हणावे लागते. अनेकांना तिकीट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. मात्र आता चाकरमान्यांना मोफत कोकणात पोहोचता येणार आहे. गणपती स्पेशल मोदी एक्सप्रेसची घोषणा करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई व मुंबई परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत.

यंदा कोकणवासीयांच्या सेवेसाठी विशेष दोन ट्रेन सज्ज होणार आहेत. अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. कोकणवासीय गणेशभक्तांना गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपती स्पेशल मोदी एक्स्प्रेस विशेष रेल्वे सेवा गेली 12 वर्षे अविरतपणे नागरिकांच्या सेवेत आहे. परंतु यंदा हि सेवा स्पेशल असून दोन ट्रेन नागरिकांच्या सेवेत सज्ज होणार आहेत. यावर्षी कोकणवासीयांच्या सेवेसाठी 2 विशेष ट्रेन सोडणार असून सर्व प्रवासी भक्तांसाठी मोफत जेवण व पाण्याची व्यवस्था असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.

दिनांक 23 व 24 ऑगस्ट 2025 अशा दोन दिवशी सकाळी 11 वाजता दादर रेल्वे स्थानकावरून या रेल्वे सुटणार आहेत. याचे तिकीट वाटप सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणार आहे. तिकिटासाठी नागरिकांनी आपापल्या मंडळ अध्यक्षांकडे नाव नोंदणी करायची आहे. शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून सकाळी 11 वाजता सुटणारी ट्रेन रत्नागिरी आणि कुडाळ ला थांबेल, या गाडीचा अंतिम थांबा सावंतवाडी असेल. तसेच रविवार 24 ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून सकाळी ११ वाजता सुटणारी ट्रेन वैभववाडी व कणकवली येथे थांबेल.
या डबल धमाका स्पेशल मोदी एक्स्प्रेस चा लाभ सर्व कोकणवासीयांना घ्यावा असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.तिकीट वाटप 18 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल. प्रवाशांनी आपल्या मंडळ अध्यक्षांकडे नाव नोंदणी करावी. बुकिंग ‘पहिले येईल त्याला प्राधान्य’ या तत्त्वावर होईल.ही सेवा फक्त 23 आणि 24 ऑगस्ट 2025 या दोन दिवसांसाठी उपलब्ध आहे.कोकणवासीय (Konkan)गणेशभक्त आणि चाकरमानी, विशेषत: मुंबई आणि मुंबई परिसरातील नागरिक या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
हेही वाचा :
शाळांमध्ये स्काऊट-गाईडची अंमलबजावणी….!
नवऱ्याने बायकोला झोपायला बोलावले अन्…
आईने बाळाला चेंडूसारखे दिलं फेकून अन्…VIDEO VIRAL