जया किशोरी तरुण आणि सुंदर त्वचेसाठी स्वयंपाक(glow) घरातील पदार्थांचा वापर करतात. यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कायम टिकून राहते. जाणून घ्या जया किशोरी यांच्या सुंदर त्वचेचे रहस्य.

प्रसिद्ध कथावाचक जया किशोरी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. त्या कायमच प्रेरणादायी विचारांनी साऱ्यांनाच प्रेरित करतात. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अनेक लोक (glow)त्यांना फॉलो सुद्धा करतात. जया किशोरी यांच्या चाहत्यांना त्यांचे सौंदर्यांचे नेमके रहस्य काय? याबद्दल जाणून घेण्याची मोठी उत्सुकता असते. सुंदर दिसण्यासाठी महिला चेहऱ्यावर सतत काहींना काही लावत असतात. स्किन केअर प्रॉडक्ट, लोशन तर कधी फेशिअल करून घेतले जाते. पण काहीवेळा त्वचा अतिशय निस्तेज आणि काळवंडल्यानंतर ती सुधारण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. महागड्या केमिकल युक्त स्किन केअर प्रॉडक्टमुळे त्वचा खराब होऊन जाते. त्यामुळे त्वचेला सूट होतील अशाच स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करावा. चुकीच्या स्किन केअर प्रॉडक्टमुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येतात.
त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर चेहऱ्याची योग्य काळजी घ्यावी. जया किशोरी त्वचा कायमच हेल्दी आणि चमकदार करण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करतात. घरगुती पदार्थांच्या वापरामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा अतिशय सूंदर दिसते.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जया किशोरी सुंदर दिसण्यासाठी कोणत्या घरगुती पदार्थांचा वापर करतात? त्यांचे सौंदर्यांचे नेमके रहस्य काय? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.
जया किशोरी यांचे स्किन केअर रुटीन:
जया किशोरी यांचे सौंदर्यचे रहस्य स्वयंपाक घरातील पदार्थांमध्ये लपलेले आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितली, बाजारातील महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करणे जास्त प्रभावी ठरते. त्या लहानपणापासूनच चेहऱ्यावर दही, बेसनाचा वापर करतात, ज्यामुळे चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो आणि त्वचा अधिक सुंदर दिसू लागते. या पदार्थांच्या वापरामुळे चेहऱ्यावर कोणतेही डाग येत नाहीत.
घरगुती फेसपॅक बनवताना वाटीमध्ये बेसन, दही, हळद, घेऊन सर्व पदार्थ एकत्र मिक्स करून करून फेसपॅक तयार करा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून १५ ते २० मिनिटं तसाच ठेवून द्या. या फेसपॅकमध्ये तुम्ही मध किंवा मुलतानी मातीचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर फेसपॅक पाण्याने स्वच्छ धुवून कोरडा करा आणि टोनर लावून ठेवा. यामुळे त्वचा हायड्रेट राहील आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो वाढेल.
हेही वाचा :
मॉडेलिंग करतात चक्क म्हशी…
घरात सकारात्मकता वाढेल …..
Amazon वरही 40 शहरांमध्ये उपलब्ध….