टीव्ही आणि बॉलिवूड जगतात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी पहिल्या पत्नीची साथ सोडून दुसरा संसार(second life) उभा केला, आणि रॉयल लाइफ जगत आहेत. अशाच चर्चेत सध्या अभिनेता रॉनित रॉय आहे, ज्याने पहिल्या पत्नी झोआना मुमताज आणि सहा महिन्यांच्या मुलीची साथ सोडून दुसरे वैवाहिक आयुष्य सुरु केले. रॉनितचा पहिला विवाह झोआनासोबत झाला, त्यांना एक मुलगी ओना आहे. मात्र, काही वर्षांनंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. सहा महिन्यांच्या ओनाच्या असताना रॉनितने वेगळे राहणे स्वीकारले आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच्या जीवनात नवीन अध्याय सुरु केला.

रॉनितने स्वतः एका मुलाखतीत ओनाबाबत सांगितले की, “ओनाला माहित आहे की मी तिचा बाप आहे. आम्ही सहा महिन्यांच्या असताना वेगळे झालो. मी तिला फार कमी वेळ दिला आणि अनेक वर्ष तिच्यासोबत मिस केले. गेल्या दिवसांचा विचार केला तरी मला प्रचंड दुःख होतं, पण आता ती मोठी झाली आहे आणि आमचं नातं आणखी घट्ट होत आहे. आमच्या नात्यात आता विश्वास आहे.”

रॉनितचा दुसरा विवाह 2003 मध्ये निलम सिंगसोबत झाला. या जोडप्याला दोन मुले आहेत – मुलगी आडोर आणि मुलगा अगस्त्य. रॉनित सध्या दुसऱ्या कुटुंबासोबत आनंदी आणि रॉयल जीवन जगत आहे, तर पहिल्या पत्नी झोआना आपल्या मुली ओनासह स्वतंत्र आणि समाधानी आयुष्य जगते. अनेक ठिकाणी रॉनितला त्याच्या दुसऱ्या कुटुंबासोबत स्पॉट करण्यात आले आहे(second life).

हेही वाचा :
रस्त्यावर माझी पँट उतरवली गेली… महेश भट्ट यांनी सांगितला धक्कादायक…
बायकोशी घटस्फोट घेतल्यावर आनंद गगनात मावेना, आईने दुधाचा अभिषेक घातला
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं नवं फीचर ,Map मध्ये दिसणार रिेल्स, स्टोरी आणि पोस्ट्स