बारावी उत्तीर्ण असून चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधताय? तर मग ही अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जारी करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आलाय(Opportunity).

भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित संस्था राष्ट्रीय तपास यंत्रणेत यंदा डाटा एंट्री ऑपरेटर आणि लोअर डिव्हिजन क्लर्क या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. ही भरती 40 रिक्त पदांसाठी असून देशातील दहशतवाद, राष्ट्रविरोधी कारवाया आणि गंभीर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या या यंत्रणेत सामील होण्याची ही उत्तम संधी आहे. एकूण 40 जागांसाठी ही भरती आहे. ज्यामध्ये डाटा एंट्री ऑपरेटर आणि लोअर डिव्हिजन क्लर्क पदांचा समावेश आहे. उमेदवारांना भारत सरकारच्या या महत्त्वपूर्ण संस्थेत काम करण्याची संधी मिळणार आहे.
लोअर डिव्हिजन क्लर्क पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण असावे आणि केंद्र/राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशातील नियमित पदावर कार्यरत असावे. डाटा एंट्री ऑपरेटरसाठी केंद्र/राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम किंवा स्वायत्त संस्थेत नियमित पदावर काम करणारे उमेदवार, ज्यांच्याकडे माहिती तंत्रज्ञानातील O किंवा A स्तरावरील प्रमाणपत्र आहे, अर्ज करू शकतात.
उमेदवारांनी NIA च्या अधिकृत अधिसूचनेतून बायोडाटा/सीव्ही प्रपत्र डाउनलोड करावा. या प्रपत्रात जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि सध्याच्या नोकरीची माहिती हस्तलिखित स्वरूपात भरावी. सर्व आवश्यक कागदपत्रे स्वयंप्रमाणित करून दिलेल्या पत्त्यावर 25 ऑक्टोबर 2025 पूर्वी पाठवावीत.

नोकरीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यानंतर प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 11 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2025 आहे. या भरतीशी संबंधित तपशील आणि अधिसूचना NIA च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी त्वरित अर्ज करून ही संधी (Opportunity)साधावी.
हेही वाचा :
बाबा वेंगाची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरणार? जगात मोठे संकट येणार?
बायको आणि 6 महिन्यांच्या मुलीला सोडून अभिनेत्याने थाटला दुसरा संसार
MBBS च्या विद्यार्थिनीवर मित्रानेच केले अत्याचार; हॉटेलवर बोलावून बेशुद्धावस्थेत दुष्कृत्य, व्हिडिओही काढले