छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यातील चिल्फी परिसरात घडलेली एक घटना संपूर्ण राज्याला भावविव्हळ करून गेली आहे. येथे एका वडिलांनी आपल्या मुलीच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच तिचा वाढदिवस(birthday) साजरा करून तिला शेवटचा निरोप दिला. हा क्षण पाहून उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले.काही दिवसांपूर्वी कवर्धा जिल्ह्यातील चिल्फी रोडवर बोलेरो आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली होती. हा अपघात इतका भीषण होता की जागेवरच पाच जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये लहानगी आदित्री आणि तिची आई यांचा समावेश होता. हे कुटुंब कोलकाता येथे राहणारे असून, ते कान्हा नॅशनल पार्क फिरायला आले होते.

संध्याकाळी बिलासपूरहून कोलकाताला परतण्यासाठी ट्रेन पकडायची होती, परंतु दुर्दैवाने रस्त्यातच भीषण दुर्घटना घडली आणि सर्व काही एका क्षणात संपलं. अपघातात मृत झालेल्या आदित्री आणि तिच्या आईवर कवर्धा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी आदित्रीच्या वडिलांनी सांगितले की, त्याच दिवशी त्यांच्या लाडक्या मुलीचा वाढदिवस होता. हे ऐकून उपस्थित सर्वजण थरारले.
वडिलांच्या इच्छेनुसार, अंत्यसंस्काराच्या ठिकाणीच आदित्रीचा वाढदिवस(birthday) साजरा करण्यात आला. लोकांनी फुगे लावून सजावट केली, केक आणला आणि चिमुकली आदित्रीला वाढदिवसाची टोपी घालून तिचा शेवटचा वाढदिवस साजरा केला.एकीकडे चितेवर शांत झोपलेल्या मुलीला शेवटचा निरोप देताना वडिलांच्या डोळ्यांत अश्रू होते, तर दुसरीकडे आयुष्यभराची सोबती असलेल्या पत्नी आणि मुलीला गमावल्याचं दु:ख अवर्णनीय होतं.

या हृदयस्पर्शी प्रसंगाने कवर्धाचे वातावरण शोकमग्न झालं. चिल्फी रोडवरील या अपघातात ३ महिला, १ पुरुष आणि १ लहान मुलगी मृत्युमुखी पडले, तर ५ जण गंभीर जखमी झाले.या दुर्घटनेने केवळ एक कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण परिसर हादरला असून, वडिलांनी आपल्या चिमुकलीला दिलेला शेवटचा वाढदिवसाचा निरोप कवर्धा कधीही विसरणार नाही.
हेही वाचा :
पेन्शन होणार दुप्पट! 11 वर्षांनी चमत्कार होणार?
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर….
शिंकताना आपले हृदय खरंच काही सेकंदांसाठी थांबते? सत्य काय?