गेल्या काही महिन्यांपासून सोनं(gold)-चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. मौल्यवान धातुने सर्व विक्रम मोडित काढत उच्चांकी दर गाठला आहे. सोनं आणि चांदी दोन्ही मौल्यवान धातुंची किंमती गगनाला भिडल्या आहेत. गुंतवणुकदारांचा कल सोन्याकडे अधिक असल्याने दिवाळीत सोनं-चांदीमध्ये ऐतिहासिक वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दर घसरण्याची शक्यता आहे. लवकरच सोन्याचा दर 1,22,000 ऐवजी 77,700 रुपये होईल. जाणून घेऊयात तज्ज्ञ काय म्हणतात.

सध्या सोन्याच्या(gold) दरात आलेली तेजी ही टिकणारी नाहीये. सोनं आणि चांदीच्या किंमती त्याच्या मुळ किंमतीपेक्षाही वधारल्या आहेत. त्यामुळं बाजारात क्रॅश होण्याची शक्यता आहे. अशी माहिती PACE 360चे फाउंडर आणि चीफ ग्लोबल स्ट्रॅटेजिस्ट अमित गोयल यांनी दिली आहे.सोनं-चांदीच्या दराबाबत म्हणायचे झाल्यास गेल्या 40 वर्षांत असं दोनदा घडलं आहे की डॉलर इंडेक्स कमजोर असताना सोन्याने इतका चांगला परतावा दिला आहे. मात्र दोन्ही वेळेला त्यानंतर सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती.

येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव आणखी वाढून पुन्हा घसरण होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात 30-35 टक्क्यांची घसरण होऊ शकते. यावेळी गोयल यांनी 2007-08 आणि 2011 चे उदाहरण दिले होते. मोठ्या तेजीनंतर सोन्याच्या किंमतीत 45 टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती. जर असं पुन्हा झालं तर सोनं 1,22,000 रुपयांनी घसरून 77,700 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत येऊ शकते.गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर सोनं $ 2,600-$2,700 प्रति औंसपर्यंत घसरू शकतो. तसंच, पुन्हा गुंतवणुक करु शकतो. त्यांचे म्हणणे आहे की, गोल्ड पुन्हा एकदा जगातील सुरक्षित व आकर्षण गुंतवणुकीचे साधन ठरू शकते. मात्र चांदीबाबत हे अश्वासन देता येऊ शकत नाही. जागतिक आर्थिक मंदीमुळं चांदीचा औद्योगिक क्षेत्रातील मागणी कमी होऊ शकते.

गोयल यांच्या म्हणण्यानुसार, सोनं आणि चांदीच्या दारात चढ-उतार होऊ शकतो. मात्र ती कायमस्वरुपी नसणार. त्यांनी म्हटलं की, बाजारात Regime Change म्हणजेच ट्रेंडमध्ये बदल होऊ शकतो. त्यानंतर सोनं पुन्हा एकदा दीर्घ काळासाठी गुंतवणुकीसाठी आकर्षक पर्याय मिळेल.

हेही वाचा :

2 वर्षांत 4 सुपरस्टार्सची बनली पत्नी, छापले 3000 कोटी, कोण आहे ती अभिनेत्री ?

 १८ वर्षीय तरुणीवर ७ जणांचा सामूहिक बलात्कार

अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *