कित्येक दिवसांपासून सोन्याच्या (Gold)दरात उच्चांकी वाढ होत होती. ऐस सणासुदीच्या काळात सोन्याचे दर गगनाला भिडल्याने सराफा बाजारातदेखील एकच खळबळ उडाली होती. मात्र आज ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. आज सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. मात्र सोनं अजूनही एक लाखांवरच आहे.

2025मध्ये सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली होती. यावर्षी सोन्याने 50 टक्क्याहून अधिक परतावा दिला आहे. आर्थिक मंदीचे संकेत, मध्यपूर्वेतील तणाव आणि अमेरिकेतील व्याजदरांवरील कपातीच्या चर्चेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित धातूंमध्ये गुंतवणूक वाढवत आहेत. त्यामुळं सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दराने विक्रमी वाढ झाली आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1860 रुपयांची घसरण (Gold)झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 1,22,290 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,700 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा सोनं 1,12,100 रुपयांवर स्थिरावलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 1390 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 91,720 रुपयांवर पोहोचली आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?
- 10 ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,12, 100 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,22,290 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 91,720 रुपये - 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,210 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 12,229 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,172 रुपये - 8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 89,680 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 97, 832 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 73, 376 रुपये - मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,12, 100 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,22,290 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 91,720 रुपये
हेही वाचा :
ChatGPT चा नवा अवतार! प्रश्न-उत्तरं सोडा, आता एका कमांडवर UPI पेमेंटही होणार
20 वर्षीय गतीमंद तरुणीवर अनेकांकडून लैंगिक अत्याचार
अजित पवारांची लाडक्या बहिणींना वॉर्निंग, ‘ही’ एक गोष्ट करावीच लागणार, अन्यथा….