कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे भाजप आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये (honey trap)अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अनोळखी महिलेने आमदारांकडून पैशांची उकळपट्टी करण्याचा प्रयत्न केला असून, या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमदार पाटील यांना गेल्या काही दिवसांपासून एका अनोळखी महिलेचे आक्षेपार्ह संदेश आणि फोटो विविध मोबाईल क्रमांकांवरून येत होते. सुरुवातीला त्या महिलेने एक लाख रुपये मागितले, नंतर दोन लाख आणि अखेर पाच लाख रुपयांची मागणी केली. या सततच्या त्रासामुळे आमदार पाटील यांनी ती महिला ब्लॉक केली. मात्र, काही दिवसांनी तिने पुन्हा दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधत अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवून धमक्या देण्यास सुरुवात केली.

महिलेने धमकी दिली की पैसे न दिल्यास ती पोलिसांत तक्रार दाखल करून आणि व्हिडीओ पसरवून आमदारांची प्रतिमा मलिन करेल. या धोक्याची जाणीव होताच, आमदार शिवाजी पाटील यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली आणि ८ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली.

पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत हा प्रकार हनी ट्रॅप रॅकेटशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आरोपी महिलेसह तिच्या संपर्क साखळीचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे.अलीकडच्या काळात अनेक राजकारणी आणि उद्योगपती हनी ट्रॅपच्या(honey trap) जाळ्यात सापडले आहेत. मात्र, या प्रकरणात आमदार पाटील यांच्या तत्परतेमुळे आणि पोलिसांच्या जलद कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

हेही वाचा :

राजकारणात पुन्हा भूकंप, शिवसेना शिंदे गटाला मोठा हादरा

कसोटी कर्णधार शुभमन गिलचे ‘या’ दोन माजी कर्णधारांवर भाष्य 

एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *