उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात एक अत्यंत विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. पंचक्रोषीमध्ये या विचित्र घटनेची चर्चा असून याबद्दल ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी हा घटनाक्रम फारच अस्वस्थ करणारा आहे. एका व्यक्तीने आपल्याच सासूशी प्रेमसंबंध आणि शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आपल्या पत्नीची(Wife) निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा असून सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

सिद्धपुरा पोलिसांच्या हद्दीतील नागला पारसी गावात 20 वर्षीय पीडिता शिवानी ही सासरवाडीमध्ये राहत्या घरासमोरच्या व्हरांड्यात मृतावस्थेत आढळली. 2018 मध्ये शिवानी आणि प्रमोदचं लग्न झालं होतं. शिवानीचे वडील नारायण सिंह यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर जावयावर आणि पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. शिवानीचा पती आणि तिची आई प्रेमवती या दोघांचे एकमेकांशी विवाहबाह्य संबंध सुरू होते. हे संबंध सुरु झाल्यापासूनच प्रमोद शिवानीचा मागील अनेक वर्षांपासून मानसिक आणि शारीरिक छळ करायचा, असा आरोप नारायण सिंह यांनी केल्याचं, ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात म्हटलं आहे.
प्रमोद आणि प्रेमवतीमधील फोनवरील संभाषण आधी शिवानीच्या कुटुंबाच्या हाती लागलं. त्यानंतर जावई प्रमोद आणि सासू प्रेमवती या दोघांना शिवानीच्या माहेरच्या मंडळींनी नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडल्याने त्यांचा संशय खरा ठरल्याचं निष्पण्ण झालं. शिवानी आणि तिच्या कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता, प्रमोदने सासूसोबतचे प्रेमसंबंध सुरू ठेवल्याचा आरोप शिवानीच्या कुटुंबियांनी केला आहे. प्रमोद आणि प्रेमवरतीच्या या वागण्यामुळे दोन्ही कुटुंबांमधील तणाव कमालीचा वाढला होता.

शिवानीला दोन लहान मुलं आहेत. शिवानीच्या मृत्यूमुळे तिची अडीच वर्षे आणि सहा महिन्यांची दोन लहान मुलं पोरकी झाली आहेत. स्वत: दोन मुलांची आई असल्याने शिवानीला पती आणि आईचे प्रेमसंबंध असल्याचा प्रचंड भावनिक त्रास होत होता, असा दावा तिच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी केली आहे. एकीकडे भावनिक त्रास असतानाच दुसरीकडे पती प्रमोद तिच्यावर नियमितपणे अत्याचार करत होता. तिचा मृतदेह सापडण्याच्या दोन दिवस आधीच प्रमोद आणि त्याचे कुटुंब गाव सोडून पळून गेले. दरम्यान, प्रमोद आणि त्याच्या सासूचे ग्राफिक आणि आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर फिरू लागले, ज्यामुळे गावकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे.
7 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली. शिवानीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलिसांनी प्रमोद आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत.मयत शिवानी आणि तिच्या कुटुंबियांना या प्रकरणात नक्की न्याय मिळेल असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे. सध्या डिजिटल पुराव्यांसह सर्व बाजूंनी तपास सुरु करण्यात आला आहे(Wife).
हेही वाचा :
माधुरी दीक्षितचं ‘हे’ गाणं दुरदर्शन, रेडियोवर केलेलं बॅन….
आता बॅलन्स नसतानाही होणार UPI पेमेंट! जाणून घ्या कसे…
कोल्हापूरच्या भाजप आमदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न…