४५ वर्षीय प्राध्यापकावर (Professor)१९ वर्षीय पदवीधर विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही घटना बंगळुरूमधील एका खासगी विद्यापीठात घडली असून, गेल्या महिन्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी तक्रारीनुसार आरोपीला ताब्यात घेतले असून, नंतर जामिनावर सोडण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी प्राध्यापकाने विद्यार्थिनीला जेवणाच्या बहाण्याने घरी बोलावले. सुरुवातीला तरुणीने नकार दिला, परंतु प्राध्यापकांच्या वारंवार विनंतीनंतर आणि आईला माहिती दिल्यानंतर तिने घरी येण्यास मान्यता दिली. प्राध्यापकाने आईला सांगितले की, त्याची पत्नी आणि मुले घरी असतील, त्यामुळे मुलगी सुरक्षित असेल.
परंतु घरात पोहोचल्यावर प्राध्यापकाने (Professor)तिला सांगितले की पत्नी आणि मुले पुढील महिन्यात येतील, आणि महत्वाच्या बाबींवर चर्चा करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर प्राध्यापकाने तरुणीवर जबरी प्रयत्न सुरू केला, तिला वैयक्तिक प्रश्न विचारले आणि ‘बॉयफ्रेंडशी ब्रेकअप कर’ असे सांगितले. ग्रेड वाढवून देण्याचे प्रलोभन दाखवून तिला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि लैंगिक छळ केला.

दरम्यान, तरुणीला मैत्रिणीचा फोन आला आणि तिने घरातून पळ काढला. धाडस करून तिने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी आरोपी प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा नोंदवला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानुसार, अटकेनंतर प्राध्यापकाला जामिनावर सोडण्यात आले आहे.या घटनेने विद्यार्थिनी सुरक्षा आणि शिक्षण संस्थांमधील जबाबदारी यावर प्रश्न उभा केला आहे.
हेही वाचा :
ओबीसीतील मूळ कुणबींचा मराठा आरक्षणाला विरोध….
बँक खात्यात शिल्लक नसल्यानंतरही UPI ट्रान्झॅक्शन
दिवाळीनंतर 77,000 वर येणार सोन्याचा भाव? तज्ज्ञांनी दिलाय इशारा…