इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीग पैकी एक असून याच्या नव्या सीजनची वाट जगभरातील क्रिकेट चाहते पाहत असतात. अशातच आता आयपीएल 2026 संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. यंदा इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या सीजनसाठी मिनी ऑक्शन पार पडणार असून यात अनेक खेळाडूंचा (player)लिलाव होणार आहे.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार आयपीएल 2026 साठीचं मिनी ऑक्शन हे 13 किंवा 15 डिसेंबर रोजी आयोजित केलं जाऊ शकतं. मागील वर्षी 18 व्या सीजनसाठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये जगभरातील हजारो खेळाडूंनी सहभाग घेतला होता, यातील जवळपास 500 खेळाडू प्रत्यक्ष लिलावात सहभागी झाले होते.

यंदा मिनी ऑक्शनपूर्वी बीसीसीआय आयपीएलमधील सर्व 10 फ्रेंचायझीला त्यांचे खेळाडू रिटेन करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी फ्रेंचायझींना खेळाडू रिटेन आणि रिलीज करता येणार आहेत. तेव्हा आयपीएल फ्रेंचायझी आयपीएल 2026 साठी त्यांच्या संघात कोणते बदल करतात? कोणत्या खेळाडूंना रिलीज करतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक(player) असून मीडिया रिपोर्ट्सनुसार ते यंदा 5 खेळाडूंना रिलीज करण्याच्या तयारीत आहेत. यात गोलंदाज दीपक चहर, अफगाणिस्तानचा एएम गझनफर, इंग्लंडचा रीस टॉपली, साऊथ आफ्रिकेचा लिझाद विल्यम्स, तर भारतीय गोलंदाज कर्ण शर्मा यांचा समावेश आहे.

चेन्नई सुपरकिंग्सने सुद्धा आयपीएलमध्ये तब्बल 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सीएसके ते यंदा 5 खेळाडूंना रिलीज करण्याच्या तयारीत आहेत. क्रिकेबझच्या रिपोर्टनुसार दीपक हुडा, विजय शंकर, राहुल त्रिपाठी, सॅम करण, देवोन कॉनवे इत्यादींना रिलीज करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

शेवग्याच्या शेंगांचं गिफ्ट, अजित पवारांनी हात जोडले अन् एकच हशा! म्हणाले, ‘बायकोला…’

आमदार राहुल आवाडे यांनी दिला गोरगरीब फेरिवाल्यांना दिलासा – दिवाळी बाजार पुन्हा सुरू!

सोने, चांदी आणि शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *