इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील शिवतीर्थ ते गांधी पुतळा परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी बाजार भरवला जात होता. मात्र, वाहतूक कोंडी(traffic) आणि गर्दीचा हवाला देत प्रशासनाने यंदा अचानक बाजारावर बंदी आणली, ज्यामुळे शेकडो फेरिवाले व विक्रेते अडचणीत सापडले.या निर्णयामुळे गोरगरीब समाजातील तसेच इतर लघुव्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. आपला व्यवसाय थांबल्यामुळे अनेकांच्या उपजीविकेवर परिणाम झाला.

मात्र या परिस्थितीत आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी स्वतः हस्तक्षेप करून प्रशासनाशी संवाद साधत फेरिवाल्यांसाठी मार्ग काढला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या ठिकाणी स्टॉल लावण्यास तात्पुरती परवानगी मिळवून दिली.

या निर्णयामुळे फेरिवाले आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वांनी आमदार राहुल आवाडे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. फेरिवाल्यांनी (traffic)सांगितले की —“आमदार साहेबांनी आमचा आवाज ऐकून घेतला आणि आम्हाला पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली. आम्ही त्यांचे आभारी आहोत.”या निर्णयामुळे इचलकरंजीतील लघुव्यावसायिकांना दिलासा मिळालाच, पण दिवाळी बाजाराची परंपरा पुन्हा टिकवून ठेवली गेली आहे.
हेही वाचा :
दागिने खरेदीची सुवर्णसंधी; उच्चांकी दरवाढीनंतर आधी स्वस्त झालं सोनं
‘फोन पे’ वरील Rent Payment ची सुविधा बंद
ChatGPT चा नवा अवतार! प्रश्न-उत्तरं सोडा, आता एका कमांडवर UPI पेमेंटही होणार