दिवाळीचा सण जवळ आल्याने गुंतवणूकदारांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे — सोने, चांदी आणि शेअर बाजारात गुंतवणूक कोणत्या प्रमाणात करावी? सणासुदीच्या काळात गुंतवणुकीसाठी हा सर्वात योग्य (gold)काळ मानला जातो, मात्र योग्य समतोल साधणं अत्यावश्यक आहे.

तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूक करताना संतुलन (बॅलन्स) राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून नफा वाढेल आणि जोखीम कमी होईल. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओतील 75 ते 80 टक्के रक्कम इक्विटीमध्ये (शेअर बाजारात) ठेवावी, असा सल्ला दिला आहे. उर्वरित गुंतवणुकीत कर्ज आणि सोनं यामध्ये ५०-५० टक्के वाटप करावं, असंही ते म्हणतात.
अल्पकालीन गुंतवणूकदारांसाठी सोनं हा उत्तम पर्याय मानला जातो. मागील १५ वर्षांत सोन्याने जास्तीत जास्त ५८% नफा आणि कमी -२१% तोटा दिला आहे. म्हणजेच, अल्प मुदतीसाठी सोनं स्थिर परतावा देऊ शकतं, पण दीर्घकालीन दृष्टीने इक्विटीच अधिक फायदेशीर ठरते.
दरम्यान, तज्ज्ञांचा दावा आहे की, चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड तेजीचा कल दिसू शकतो. सौर उद्योग, इलेक्ट्रिक वाहनं आणि संरक्षण क्षेत्रात वाढत्या मागणीमुळे चांदीचं महत्त्व झपाट्याने वाढत आहे. गेल्या दशकात सुमारे ५० कोटी औंस चांदीचा साठा कमी झाला आहे, त्यामुळे पुरवठा कमी आणि मागणी वाढल्याने किंमतींना मोठी चाल मिळू शकते.

इतिहास पाहता, जेव्हा निफ्टी किंवा इक्विटी बाजार घसरतो, तेव्हा सोन्याचे दर साधारणपणे वाढतात. म्हणजेच, सोनं आणि शेअर बाजार एकमेकांच्या उलट दिशेने हालचाल करतात, ज्यामुळे पोर्टफोलिओमध्ये स्थैर्य येतं.
तज्ज्ञांचं स्पष्ट मत आहे की, दिवाळीच्या गुंतवणुकीसाठी सोनं, चांदी आणि इक्विटी यांचा संतुलित समतोलच सर्वोत्तम ठरेल. बाजारातील चढ-उतार, मागणी-पुरवठा आणि दीर्घकालीन(gold) परतावे लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी रणनीती आखल्यास सणासुदीचा काळ आर्थिक दृष्ट्या अधिक शुभ ठरू शकतो.
हेही वाचा :
दागिने खरेदीची सुवर्णसंधी; उच्चांकी दरवाढीनंतर आधी स्वस्त झालं सोनं
‘फोन पे’ वरील Rent Payment ची सुविधा बंद
ChatGPT चा नवा अवतार! प्रश्न-उत्तरं सोडा, आता एका कमांडवर UPI पेमेंटही होणार