महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये न्यूझीलंडने (match)आपला पहिला विजय मिळवला आहे. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील ११ व्या सामन्यात किवी संघाने बांगलादेशचा १०० धावांनी पराभव केला.

महिला विश्वचषक दिवसेंदिवस मनोरंजक होत चालला आहे. महिला क्रिकेटमधील मजबूत संघ न्यूझीलंडच्या संघाला पहिल्या दोन सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. आता न्यूझीलंडच्या संघाने विजयाचे खाते उघडले आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये न्यूझीलंडने आपला पहिला विजय मिळवला आहे. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील ११ व्या सामन्यात किवी संघाने बांगलादेशचा १०० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ९ विकेट गमावून २२७ धावा केल्या.
तथापि, संघाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत संपूर्ण बांगलादेश संघाला फक्त १२७ धावांत गुंडाळले. जेस केरने गोलंदाजीत कहर केला, फक्त २१ धावांत ३ बळी घेतले. ली (match)ताहुहूनेही ३ बळी घेतले. २२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांनी फक्त ३३ धावांत सहा विकेट गमावल्या. त्यानंतर फहिमा खातून आणि नाहिदा अख्तर यांनी सातव्या विकेटसाठी ३३ धावा जोडल्या. नाहिदा १७ धावांवर बाद झाली. त्यानंतर राबेया खानने फहिमासोबत आठव्या विकेटसाठी ४४ धावा जोडल्या.
तथापि, जेस केरने राबेयाला बाद करून बांगलादेशला फक्त १२७ धावांवर गुंडाळले. केरने तिच्या आठ षटकांच्या स्पेलमध्ये फक्त २१ धावा दिल्या, ज्यामध्ये एक मेडनचा समावेश होता. दरम्यान, ली ताहुहूने तिच्या सहा षटकांमध्ये २२ धावा देत तीन विकेट घेतल्या. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची सुरुवातही खराब झाली. संघाने आपले पहिले तीन विकेट फक्त ३८ धावांत गमावले. तथापि, कर्णधार सोफिया डेव्हाईन आणि ब्रुक हॉलिडे यांनी चौथ्या विकेटसाठी ११२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
हॉलिडे १०४ चेंडूंचा सामना केल्यानंतर ६९ धावांवर बाद झाली. दरम्यान, सोफियाने शानदार फलंदाजी करत ८५ चेंडूत ६३ धावा केल्या आणि न्यूझीलंडला २०० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली. न्यूझीलंडचे तीन सामने आतापर्यत झाले आहेत, यामध्ये अजून त्याचे चार सामने शिल्लक आहेत. पाकिस्तान, श्रीलंका, भारत आणि इंग्लड या देशांविरुद्ध सामने खेळणे शिल्लक आहेत. या स्पर्धेमध्ये भारत आणि इंग्लड हे दोन्ही संघ मजबूत आहेत.
हेही वाचा :
शेवग्याच्या शेंगांचं गिफ्ट, अजित पवारांनी हात जोडले अन् एकच हशा! म्हणाले, ‘बायकोला…’
आमदार राहुल आवाडे यांनी दिला गोरगरीब फेरिवाल्यांना दिलासा – दिवाळी बाजार पुन्हा सुरू!
सोने, चांदी आणि शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी?