दिवाळीमध्ये प्रत्येकालाच सुंदर दिसायचं असत. सुंदर(beautiful) दिसण्यासाठी बाजारातील फेशिअल किंवा क्लीनअप करण्याऐवजी या सोप्या टिप्स फॉलो करून त्वचेची काळजी घ्यावी. यामुळे तुम्ही सुंदर दिसाल.

राज्यासह संपूर्ण देशभरात दिवाळी सणाचा उत्साह आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये सगळीकडे एन वेगळाच आनंद आणि उत्साह असतो. या दिवसांमध्ये सगळीकडे दिव्यांची रोषणाई केली जाते. याशिवाय अंगणात सुंदर रांगोळी काढून संपूर्ण घर सजवले जाते. दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे सगळीकडे खूप जास्त घाई असते. घाईच्या वेळी पार्लरला जाण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. अशावेळी महिला बाजारात मिळणारा कोणताही फेसपॅक किंवा फेसमास्क चेहऱ्यावर लावतात. पण हे उपाय केल्यामुळे काही काळापुरती (beautiful) त्वचा अतिशय सुंदर आणि देखणी दिसते. त्वचेच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी महिला वारंवार वेगवेगळे उपाय करत असतात. पण सतत केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरल्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दिवाळी सणानिमित्त चेहऱ्यावर चमकदार ग्लो मिळवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यास चेहऱ्यावरील ग्लो कधीच कमी होणार नाही.

घरगुती फेसपॅकचा वापर:

सर्वच महिलांना आपली त्वचा कायमच सुंदर आणि देखणी हवी असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या फेसपॅकचा वापर केला जातो. त्यामुळे तुम्ही सुद्धा घरच्या घरी बेसन हळदीचा फेसपॅक बनवून त्वचेची काळजी घेऊ शकता. यासाठी मोठ्या वाटीमध्ये बेसन, हळद, दही घेऊन मिक्स करून घ्या. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. यामुळे त्वचेवर चमकदार ग्लो येईल आणि त्वचा अधिक सुंदर दिसेल. बेसन फेसपॅक लावल्यामुळे त्वचा मुलायम आणि सुंदर होईल.

पुरेशी झोप घेणे:

शरीराला विश्रांतीची खूप जास्त आवश्यकता असते. शांत झोप घेतल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. त्यामुळे दिवाळी सणाला जास्त वेळ जागरण करू नये. जास्त वेळ जागरण केल्यामुळे त्वचा अधिकच निस्तेज होऊन जाते आणि काळे डाग येऊ लागतात. त्यामुळे ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. झोपल्यामुळे शरीरासोबतच त्वचेला सुद्धा अनेक फायदे होतात.

भरपूर पाण्याचे सेवन:

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पाण्याच्या सेवनामुळे शरीरात जमा झालेली विषारी घटक बाहेर पडून जातात आणि चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो. याशिवाय पाण्याच्या सेवनामुळे लिंबू पाणी, चिया सीड्स पाणी किंवा विटामिन सी युक्त पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे शरीरासोबत त्वचा सुद्धा चमकदार होते. ऑक्टोबर हिटपासून शरीराचा बचाव करण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे.

संतुलित आहार:

शरीर आणि त्वचा कायमच निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे जास्त गरजेचे आहे. आहारात ताजी फळे, भाज्या, काकडी, गाजर, दूध, दही आणि मूग डाळ इत्यादी पदार्थांचे नियमित सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे संपूर्ण शरीराला फायदे होतात. याशिवाय सणाच्या दिवशी कमी तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन करावे.

हेही वाचा :

‘भूत कोला’ पण सण देवाचा…

वेळीच सावध होऊन घ्या उपचार

आजचा बुधवार राशींसाठी भाग्यशाली! श्रीविठ्ठलाच्या कृपेने अडचणी होतील दूर,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *