“संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत, कुरकुरीत आणि झटपट तयार होणारे स्नॅक्स खाण्याची मजा काही औरच असते. अशा वेळी मसाला पापडी हा एक परफेक्ट पर्याय ठरतो. ही पापडी(Masala Papad) घरच्या घरी सहज तयार करता येते आणि त्यासाठी लागणारे सर्व साहित्य घरातच उपलब्ध असते. मसाला पापडीला बाहेरून कुरकुरीत टेक्स्चर आणि आतून हलका मसालेदार स्वाद असतो. ती बनवताना बेसन, मैदा आणि तिखट-मीठ यासारखे सोपे घटक वापरले जातात. चहासोबत खाण्यासाठी ही एक परफेक्ट डिश आहे.

ही पापडी तुम्ही चहासोबत, सणासुदीच्या दिवसांत किंवा पाहुणचारासाठी बनवू शकता. शिवाय, ती एकदम क्रिस्पी असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. मसाला पापडी(Masala Papad) दीर्घकाळ टिकणारी असल्याने ती एका एअरटाईट डब्यात साठवून ठेवली, तर काही दिवसांसाठी टिफिनमध्ये किंवा प्रवासातही खाऊ शकतो. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

१ कप मैदा
१/४ कप रवा
२ टेबलस्पून बेसन
१ टेबलस्पून तेल (मोहनासाठी)
१/२ टीस्पून अजवाइन
१/२ टीस्पून लाल तिखट
चिमूटभर हळद
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
आवश्यकतेनुसार पाणी
अचानक आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत- तिखट मुगडाळ, नोट करा रेसिपी

कृती:

यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, रवा आणि बेसन घ्या. त्यात मीठ, लाल तिखट, हळद आणि अजवाइन घाला.यानंतर त्यात मोहनासाठी तेल टाका आणि सर्व घटक चांगले एकत्र करून घ्या. हातात धरल्यावर पीठ थोडं एकत्र राहील असं मिश्रण तयार करा.आता थोडं थोडं पाणी घालत घट्ट आणि घट्टसर पीठ मळून घ्या. त्यावर ओलसर कापड झाकून १५-२० मिनिटे बाजूला ठेवा.मळलेले पीठ छोटे गोळे करून त्याची पातळ पोळी लाटा.

ती काट्याने टोचून घ्या जेणेकरून तळताना फुगणार नाही.लाटलेली पोळी छोट्या चौकोनी किंवा गोल आकारात कापा.कढईत तेल गरम करा आणि या पापड्या मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.तळलेल्या पापड्या टिश्यू पेपरवर काढा जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.पापडी तळताना आच मध्यम ठेवा, म्हणजे त्या कुरकुरीत होतील.अजवाइनऐवजी तुम्ही थोडं काळं मीठ घालूनही स्वाद बदलू शकता.थंड झाल्यावर त्या एअरटाईट डब्यात साठवा.

हेही वाचा :

अनैतिक संबंधांत गुरफटली, नवऱ्याला थेट नदीत फेकलं, प्रियकरासोबत…

Virat Kohli आणि Rohit Sharma अजून संपले नाहीत” 2027 विश्वचषकावर लक्ष केंद्रित

मोठी राजकीय घडामोड! मुख्यमंत्री सोडून सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *