सणासुदीच्या हंगामात रेल्वे तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, आणि अशा वेळी काउंटरवर किंवा आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर तिकीट बुक करणे अनेक प्रवाशांसाठी आव्हान ठरते. यामुळे प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी सोय सुरू झाली आहे. आता लोक आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधूनही ट्रेनची तिकिटे(train ticket) बुक करू शकतील. भारतातील पोस्ट विभागाने रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने ही सुविधा सुरू केली आहे. सध्या देशभरातील ३३३ निवडक पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे, विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागात जिथे रेल्वे काउंटर नाहीत.

या सुविधेद्वारे स्लीपर, एसी आणि जनरल या सर्व वर्गांची तिकिटे पोस्ट ऑफिसमधून बुक करता येतील. प्रवाशांना फक्त जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन प्रवासाची माहिती, स्थानकाचे नाव, तारीख, ट्रेनचे नाव किंवा क्रमांक, वर्ग वगैरे देणे आवश्यक आहे. विहित फॉर्म भरण्यानंतर आणि तिकिटाचे पैसे दिल्यानंतर पोस्ट ऑफिस कर्मचारी बुकिंग प्रणालीमध्ये त्वरित नोंद करेल आणि तिकीट उपलब्ध होईल.

दरम्यान, १ ऑक्टोबरपासून रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी (train ticket)नवीन नियमही लागू केला आहे. आता केवळ आधार-सत्यापित युजर्स आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा अ‍ॅपवर तिकीट उघडल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांसाठीच बुक करू शकतील. अधिकृत एजंट्ससाठी १० मिनिटांचे निर्बंध पूर्वीसारखेच लागू राहतील. हे पाऊल पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट बुकिंग रोखण्यासाठी उचलण्यात आले आहे. प्रवाशांसाठी ही नवीन सुविधा आणि नियम सणासुदीच्या हंगामात प्रवास सोपा आणि सुरक्षित बनवतील.

हेही वाचा :

“तर सरकारला सोडणार नाही…; उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

क्रिकेटचा नवा फॉरमॅट लाँच होणार, जाणून घ्या काय आहेत नवे नियम..

पोस्ट ऑफिसची पती-पत्नींसाठी जबरदस्त योजना…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *