क्रिकेट जगतात एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. टेस्ट, वनडे आणि टी20 नंतर आता चौथा फॉरमॅट येतोय म्हणजे टेस्ट ट्वेंटी . हा फॉरमॅट(format) पारंपरिक टेस्ट क्रिकेटच्या गभीरतेला आणि टी20 च्या रोमांचक वेगाला एकत्र आणणार आहे. 80 ओव्हर्सच्या या नव्या संकल्पनेमुळे क्रिकेटला एक वेगळा चेहरा मिळणार आहे, जिथे खेळाडूंना कसोटी सामन्याप्रमाणे दोन डावांमध्ये खेळण्याची संधी मिळेल, पण गती आणि रणनीती टी20 सारखी असेल.

क्रिकेट चाहत्यांसाठी ही बातमी अत्यंत रोमांचक आहे कारण हा फॉरमॅट एकाच वेळी तांत्रिक, मानसिक आणि मनोरंजनात्मक अनुभव देणार आहे. या स्पर्धेत खेळाडूंची कसोटी घेणारे लांब फॉरमॅटचे तत्त्व कायम ठेवले जाणार आहे, पण त्यात वेग, थरार आणि वेळेचे नियोजन टी20 प्रमाणे असेल. क्रिकेटचा आनंद एका नव्या पातळीवर नेणारा हा फॉरमॅट म्हणून त्याकडे जगभरातील क्रिकेट मंडळे आणि चाहते लक्ष ठेवून आहेत.

क्रिकेटमध्ये नेहमीच काही ना काही बदल होत असतात, पण यावेळी एक अगदी वेगळा आणि रोमांचक फॉरमॅट समोर आला आहे, टेस्ट ट्वेंटी. या फॉरमॅटचा उद्देश टेस्ट क्रिकेटच्या तांत्रिक आणि मानसिक बाजूला टी20 च्या जलद गती आणि मनोरंजनासोबत जोडणे आहे. या प्रोजेक्टसाठी वेस्टइंडीजचे महान खेळाडू सर क्लाईव्ह लॉयड, दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स, ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन आणि टीम इंडियाचे माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांना सल्लागार मंडळात स्थान देण्यात आले आहे. तसेच राजस्थान रॉयल्सचे माजी सीईओ मायकल फोर्डहॅम यांची चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

टेस्ट ट्वेंटी फॉरमॅट हा जगातील पहिला 80 ओव्हर्सचा फॉरमॅट (format)असेल. यात दोन्ही संघांना प्रत्येकी दोनदा फलंदाजी करण्याची संधी मिळेल. प्रत्येक डाव 20 ओव्हर्सचा असेल. म्हणजेच दोन्ही संघ 20-20 ओव्हर्सचे दोन डाव खेळतील, अगदी टेस्ट मॅचसारखे. या फॉरमॅटमध्ये टेस्ट आणि टी20 दोन्हींचे नियम लागू असतील. त्यात विजय, पराभव, बरोबरी किंवा ड्रॉ — हे चारही निकाल शक्य असतील.

टेस्ट ट्वेंटीचा पहिला सीझन जानेवारी 2026 मध्ये सुरू होईल. यात एकूण 6 फ्रँचायझी संघ सहभागी होतील. त्यापैकी तीन संघ भारतातून असतील, तर उर्वरित तीन संघ दुबई, लंडन आणि अमेरिका येथून प्रतिनिधित्व करतील. प्रत्येक संघात 16 खेळाडू असतील. या फॉरमॅटचा अधिकृत लाँच 16 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आला. टेस्ट ट्वेंटीची संकल्पना वन वन सिक्स नेटवर्कचे कार्यकारी अध्यक्ष गौरव बहिरवानी यांच्या कल्पनेतून आली आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी या संकल्पनेचे कौतुक केले आहे.

दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स म्हणाले की, “टेस्ट ट्वेंटीमुळे क्रिकेटमध्ये आणखी रोमांच आणि स्पर्धा वाढेल. तसेच तरुण खेळाडूंनाही आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल.”वेस्टइंडीजचे दिग्गज सर क्लाईव्ह लॉयड यांनी सांगितले, “क्रिकेटने प्रत्येक युगात स्वतःला बदलले आहे, पण इतक्या विचारपूर्वक बदलाची कल्पना यापूर्वी नव्हती. टेस्ट ट्वेंटी हा फॉरमॅट खेळाची पारंपरिक कला आणि लय टिकवून ठेवत त्यात आधुनिकतेचा नवा जोश भरतो.”

हेही वाचा :

रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट?

महिलेने चालू ट्रेनमध्ये मोटरमॅनवर निशाणा साधत काचेवर मारला भलामोठा दगड Video Viral

‘कच्चा बादाम’ गाणे आठवतंय का? झोपडीत राहणारा गायक आज राहतोय बंगल्यात..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *