इचलकरंजी शहरात दरवर्षीप्रमाणे शिवतीर्थ ते गांधी पुतळा या मुख्य रस्त्यावर भरवला जाणारा दिवाळी बाजार (market)यंदा होणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या निर्णयानुसार रस्त्याच्या मधोमध बाजार भरवण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लहान मोठ्या व्यापाऱ्यांना मोठा धक्का बसला असून, नागरिकांमध्येही चर्चेचं वातावरण निर्माण झालं आहे.

न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट नमूद केलं आहे की रस्त्यावर बाजार भरवल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होतात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होतो. त्यामुळे महापालिकेने अशा प्रकारे रस्त्यावर बाजार (market)भरू नये, तसेच वाहतुकीस कोणताही अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिका आणि पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे रस्त्यावर कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असा निर्देश न्यायालयाने दिला आहे. या निकालानंतर याचिकाकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण त्यांनीच या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल केली होती.पन्नास वर्षांपासून दिवाळीचा बाजार या ठिकाणी भरत होता. शहरातील व्यापारी आणि नागरिकांसाठी ही एक परंपरा झाली होती, परंतु न्यायालयाच्या आदेशामुळे आता हा बाजार रस्त्याऐवजी मोकळ्या जागेत भरवावा लागणार आहे.

या निर्णयामुळे वाहतूक सुकर होण्याची शक्यता आहे, मात्र दुसरीकडे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अनेक व्यापाऱ्यांना आता नव्या ठिकाणाच्या शोधात जावे लागणार असून, बाजारासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने तातडीने पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.इचलकरंजी शहरातील प्रशासन आता दिवाळी बाजारासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
हेही वाचा :
“तर सरकारला सोडणार नाही…; उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?
क्रिकेटचा नवा फॉरमॅट लाँच होणार, जाणून घ्या काय आहेत नवे नियम..
पोस्ट ऑफिसची पती-पत्नींसाठी जबरदस्त योजना…