पोस्ट ऑफिस(Post Office) हे गुंतवणुकीसाठी नेहमीच एक सुरक्षित आणि विश्वासार्ह माध्यम मानले जाते. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना विविध बचत योजनांवर आकर्षक परतावा देते. यापैकीच एक लोकप्रिय योजना म्हणजे मंथली इन्कम स्कीम , ज्यामध्ये एकदाच गुंतवणूक करून तुम्ही दरमहा निश्चित उत्पन्नाची सोय करू शकता. विशेषतः, तुम्ही तुमच्या पत्नीसोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत जॉइंट खाते उघडून याचा मोठा फायदा घेऊ शकता.

पोस्ट ऑफिसच्या(Post Office) मंथली इन्कम स्कीमवर सध्या वार्षिक ७.४ टक्के इतका आकर्षक व्याजदर मिळत आहे. या योजनेत तुम्ही किमान १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. एकल खात्यासाठी कमाल गुंतवणुकीची मर्यादा ९ लाख रुपये आहे, तर संयुक्त खात्यासाठी ही मर्यादा १५ लाख रुपये इतकी आहे. संयुक्त खात्यात तुम्ही जास्तीत जास्त तीन व्यक्तींना एकत्र समाविष्ट करू शकता.
जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत मिळून या योजनेत १० लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर ७.४ टक्के वार्षिक व्याजदरानुसार तुम्हाला दरमहा ६,१६७ रुपये इतके निश्चित व्याज मिळेल. हे व्याज थेट तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात जमा केले जाते, जे तुम्ही तुमच्या मासिक खर्चासाठी वापरू शकता.

ही योजना ५ वर्षांसाठी असून, मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर तुमची १० लाख रुपयांची मूळ रक्कम तुम्हाला परत केली जाते. जर तुम्ही संयुक्त खात्यात कमाल १५ लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला दरमहा ९,२५० रुपये व्याज मिळू शकते.पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीममध्ये खाते उघडण्यासाठी तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे अनिवार्य आहे. या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर कोणताही धोका न पत्करता दरमहा एका निश्चित उत्पन्नाची हमी मिळवू शकता.
हेही वाचा :
रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट?
महिलेने चालू ट्रेनमध्ये मोटरमॅनवर निशाणा साधत काचेवर मारला भलामोठा दगड Video Viral
‘कच्चा बादाम’ गाणे आठवतंय का? झोपडीत राहणारा गायक आज राहतोय बंगल्यात..