केंद्र सरकारने महिलांच्या आरोग्य आणि पोषणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील एक महत्वाची योजना म्हणजे पीएम मातृ वंदना योजना, जी गर्भवती महिलांना (Pregnant women)आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश गर्भवती महिलांना उत्तम पोषण मिळावे, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि समाजात मुलींच्या जन्माबाबत सकारात्मकता निर्माण व्हावी हा आहे.योजना एकात्मिक बाल विकास प्रकल्पाअंतर्गत राबवली जाते. २०२५-२६ मध्ये अंदाजे ५ लाखांपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

मातृ वंदना योजनेत आर्थिक मदत टप्प्याटप्प्याने मिळते:
पहिल्या गर्भधारणेसाठी: ५००० रुपये
गर्भधारणा नोंदणी नंतर ६ महिन्यांच्या आत: ३००० रुपये
बाळाच्या जन्मानंतर १४ आठवड्यांपर्यंत: २००० रुपये (बाळाला लस दिल्यानंतर)
दुसऱ्या बाळाच्या जन्मावर: ६००० रुपये
योजना घेण्यासाठी पात्रता:
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक
अनुसूचित जाती / जमातीतील महिला
बीपीएल रेशन कार्डधारक महिला
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभार्थी महिला
ई-श्रम कार्डधारक महिला
मनरेगा योजनेच्या लाभार्थी
अंगणवाडी सेविका, मदतनीस

पीएम मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑफलाइन (Pregnant women)पद्धतीने करता येतो. त्यासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय मध्ये संपर्क साधावा लागतो.ही योजना गर्भवती महिलांसाठी आर्थिक आणि आरोग्यदृष्ट्या मोठा आधार ठरते, ज्यामुळे मातृत्व काळ अधिक सुरक्षित आणि सुलभ बनतो.
हेही वाचा :
महायुतीमध्ये वादाची ठिणगी; ‘या’ जिल्ह्यात स्वबळावर लढण्याची घोषणा…
“गोकुळ” संघाच्या दुधाला जुन्याच राजकारणाचा वास
‘….वेळप्रसंगी किंमत मोजू’; अजित पवारांचं मोठं वक्तव्य