केंद्र सरकारच्या पीएम उज्जवला योजनेत महिलांसाठी खास सुविधा सुरू असून, आता महिलांना दोन गॅस सिलिंडर(cylinder) रिफिल करण्यासाठी एकूण 1830 रुपये सब्सिडी मिळणार आहे. यामध्ये प्रत्येक गॅस सिलिंडरसाठी 915 रुपये सब्सिडी देण्यात येणार असून, केंद्र सरकार ३५९ रुपये आणि राज्य सरकार ५५६ रुपये भरणार आहे.

उत्तर प्रदेश सरकारने दिवाळीच्या मूहूर्तावर महिलांसाठी ही सुविधा घोषित केली असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. गोरखपूर जिल्ह्यात सुमारे दोन लाख ९३ हजार महिलांना उज्जवला योजनेचा लाभ मिळालेला असून, या महिलांना आता अतिरिक्त गॅस सिलिंडर (cylinder)रिफिलची सोय उपलब्ध होणार आहे. ही योजना विशेषतः त्या महिलांसाठी आहे ज्या पूर्वी पारंपरिक चुलीवर जेवण बनवायच्या आणि धुरापासून त्रास भोगावा लागत होता.
लाभार्थी महिलांना सिलिंडर भरताना रक्कम रोख स्वरूपात द्यावी लागते आणि नंतर आधार-आधारित पेमेंटद्वारे सब्सिडी थेट बँक खात्यात जमा केली जाते. तसेच, अधिकारी सांगतात की प्रधानमंत्री उज्जवला योजना ३.० लवकरच सुरू होणार आहे, ज्यात ज्या महिलांना अद्याप गॅस कनेक्शन मिळाले नाही, त्या महिलाही अर्ज करू शकतात.
योजनेसाठी अर्ज करताना महिला अनुसूचित जाती, जमातीतील असाव्यात, वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे, त्यांच्या नावावर गॅस कनेक्शन असावे, आणि कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीकडे एलपीजी कनेक्शन नसावे. या नव्या सुविधेमुळे महिलांना स्वयंपाकाच्या कामात सोय आणि सुरक्षितता मिळेल, तसेच पारंपरिक धुरकट चुलींचा त्रास कमी होईल.
हेही वाचा :
एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी भाजपनेच टाकलं जाळं…
दिवाळीत BSNL चा बंपर प्लॅन! फक्त 1 रुपयात सिम आणि 30 दिवस मोफत सेवा!
कंपनीने कर्मचाऱ्यांना असे दिवाळी गिफ्ट्स दिले की पाहून सर्वांचे डोळे विस्फारले, युजर्स म्हणाले, “व्हॅकेन्सी आहे का?”; Video Viral