स्मृती मंधानाने तिच्या धडाकेबाज फलंदाजीने फार कमी काळातच मोठा चाहते वर्ग मिळवला आहे. स्मृती केवळ 11 वर्षांची असताना तिची अंडर 19 संघात निवड झाली. क्रिकेटपटू(Cricketer) स्मृतीने 10 एप्रिल 2013 रोजी बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दाल एक महत्तवाची बातमी समोर आली ती म्हणजे स्मृतीचा प्रियकर पलाश. स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड आणि चित्रपट संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलने इंदोरच्या एका कार्यक्रमात मोठी घोषणा करून टाकली आहे

स्मृती मंधाना आणि पलाश हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी कळताच चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. एवढेच नाही तर आनंद व्यक्त करताना पलाश म्हणाला, “स्मृती लवकरच इंदौरची सून होईल. इंदूर माझ्या मनात वसलेलं आहे” यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना पुर्णविराम लागला असला तरी आता हे सुंदर जोडपं लग्न कधी करणार या कडे सगळ्यचं लक्ष लागलेलं आहे.

पलाशने आत्तापर्यांत कित्येक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे त्यासोबतच 40 हुन जास्त गाणी लिहीली आहेत. तो सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छालचा भाऊ आहे. स्मृतीचा प्रत्येक क्रिकेट (Cricketer)सामना पाहण्यासाठी पलाश खूप उत्सुक असतो. त्यांची एकत्रित संपत्ती 70 कोटींपेक्षा जास्त आहे, हेच कारण आहे की ते भारतीय क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील सर्वात प्रशंसनीय पॉवर कपलपैकी एक बनले आहेत.

महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना सध्या इंदौरमध्ये असल्याची माहिती पलाशने दिली. ती सध्या सुरू असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषकात सहभागी होत आहे. 19 ऑक्टोबरला भारत आणि इंग्लंड यांच्यात एक महत्त्वाचा सामना होणार आहे. भारतीय संघाचे आणि खास स्मृतीचे मनोबल वाढवण्यासाठी तो स्टेडियमला ​​भेट देणार असल्याचे पलाशने सांगितले.

पलाश मुच्छल सध्या त्यांचा नवीन चित्रपट ‘राजू बँड वाला’ दिग्दर्शित करत आहेत. हा चित्रपट बँड सदस्यांच्या जीवनावर, संघर्षांवर आणि भावनांवर आधारित आहे. ‘पंचायत’ या वेब सिरीजमधून प्रसिद्धी मिळवणारा अभिनेता चंदन रॉय मुख्य भूमिकेत आहे, तर ‘बालिका वधू’ फेम अविका गोर ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. पलाशने सांगितले की या चित्रपटात अनेक प्रमुख कलाकार कॅमिओ भूमिकांमध्ये दिसतील आणि हा एकाप्रकारे बँड उद्योगाला श्रद्धांजली असेल.

हेही वाचा :

‘भुरटा छगन भुजबळ राज्याला साडेसाती आहे’; मनोज जरांगे संतापले

केंद्र सरकारची खास योजना! गरोदर महिलांना मिळतायत ६००० रुपये…

महायुतीमध्ये वादाची ठिणगी; ‘या’ जिल्ह्यात स्वबळावर लढण्याची घोषणा…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *