पर्थ येथे खेळल्या गेलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया तीन वनडे मालिकेच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला (Team India)7 विकेट्सच्या फरकाने लाजिरवाणी हार पत्करावी लागली. पावसामुळे सामना 26 षटकांत मर्यादित ठरला. ज्यात भारताने 36 धावांपर्यंत मजल मारली. डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार ऑस्ट्रेलियासमोर 131 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. जे कर्णधार मिशेल मार्शच्या नाबाद 46 धावांच्या जोरावर त्यांनी 21.1 षटकांत गाठले. भारताच्या टॉप ऑर्डरने निराश केले, ज्यामुळे मालिका 0-1 ने सुरू झाली.

सात महिन्यांच्या अंतरानंतर वनडे फॉरमॅटमध्ये पुनरागमन करणाऱ्या कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या खेळाकडे साऱ्यांच्या नजरा होत्या. पण दोघांकडून मोठा अपेक्षाभंग झाला. रोहित शर्मा 8 धावांवर तर विराट कोहली ० धावांवर आऊट झाला. पर्थच्या वेगवान आणि उंच उसळी असलेल्या खेळपट्टीवर रोहितला जोश हॅझलवूडने स्लिपमध्ये झेलत बाद केले. तर विराटला मिशेल स्टार्कने डकवर्थ-लुईस पद्धतीने पहिल्याच चेंडूवर माझेमनने झेलत परत पाठवले. यानंतर मैदानात उतरलेले गिल आणि अय्यरदेखील चांगली कामगिरी रु शकले नाहीत. शुभमन गिल 10 रन्स तर श्रेयस अय्यर11 रन्स करुन आऊट झाला.

माजी भारतीय कप्तान सुनील गावस्कर यांनी या अपयशानंतरही आशावादी भूमिका घेतली. ‘पर्थची खेळपट्टी ऑस्ट्रेलियातील सर्वांत कठीण आहे, विशेषतः जे खेळाडू काही महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होते ते त्याच्याशी जुळवून घेणे सोपे नव्हते’, असे इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी सांगितले. नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली टीम इंडिया(Team India) लवकरच यातून बाहेर पडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच गावस्कर यांनी शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांची बाजूदेखील सावरुन घेतली.

गावस्कर यांनी रोहित आणि विराटबद्दल खळबळजनक विधान केले. ‘ रोहित-विराट यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेतील त्यांच्या मोठ्या धावसंख्येने आश्चर्य वाटू नये, असे ते म्हणाले. सराव आणि नेट सेशन्समुळे हे दिग्गज लवकरच लयीत येतील. जितक्या जास्त मॅच खेळतील आणि थ्रो-डाउन करतील, तितक्या वेगाने ते परत फॉर्म मिळवतील. कदाचित ते गोलंदाजांना 20 यार्डांवरून सराव करायला लावतील,’ असे गावस्कर म्हणाले. दुसरी वनडे 23 ऑक्टोबरला अॅडलेड येथे होईल. विराटचा उत्कृष्ट रेकॉर्ड असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘रोहित आणि विराट एकदा धावा काढायला लागले की, भारताची एकूण धावसंख्या 300 किंवा त्याहून अधिक होईल’, असे गावस्कर म्हणाले. गावस्कर यांचे हे विधान भारतीय चाहत्यांना उत्साहित करणारे आहे. कारण मालिकेत अजून दोन संधी बाकी आहेत. ऑस्ट्रेलियाच्या घरच्या मैदानावर खेळत असतानाही भारताच्या अनुभवी जोडीवर विश्वास ठेवणाऱ्या गावस्करांच्या या भविष्यकथनेमुळे संघाला प्रेरणा मिळेल अशा प्रतिक्रिया टीम इंडियाचे चाहते देत आहेत.

हेही वाचा :

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार…

यंदा दिवाळीत WhatsApp वर द्या पर्सनलाइज्ड शुभेच्छा! तुमच्या फोटोसह तयार करा अनोखे स्टिकर्स

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या स्टारने घेतला मोठा निर्णय…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *