सांगली जिल्ह्यातील पोलिसांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘संस्कृती सबसिडीअर कॅन्टीन’ (canteen)मध्ये तब्बल ७४ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिस कल्याण शाखेचे निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, कॅन्टीनचे व्यवस्थापक हवालदार भूपेश चांदणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहा वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस अधीक्षक दिलीप सावंत यांनी पोलिसांना स्वस्त दरात किराणा माल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी ही कॅन्टीन सुरू केली होती. या कॅन्टीनला मोठा प्रतिसाद मिळत असतानाच, गेल्या काही वर्षांत आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचे उघड झाले आहे.

लेखापरीक्षणानुसार, १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत सुमारे ४५ लाख रुपयांची तफावत आढळली, तर २०२४-२५ या वर्षात आणखी २९ लाख रुपयांची तफावत आढळली(canteen). दोन्ही वर्षे मिळून एकूण ७४ लाख ३ हजार ५६७ रुपयांचा अपहार झाल्याचे विश्वेश देशपांडे अँड कंपनी या लेखापरीक्षकांनी अहवालात नमूद केले आहे.

हा अहवाल पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ३० मे २०२५ रोजी चौकशीचे आदेश दिले. चौकशीचे काम आर्थिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक अरुण सुगावकर यांनी हाती घेतले. त्यांच्या तपासात चांदणे याच्यावर गंभीर गैरव्यवहाराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर १८ जून २०२५ रोजी अंतिम अहवाल अधीक्षकांकडे सादर करण्यात आला.

यानंतर पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार गुरुवारी रात्री संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस आता या अपहार प्रकरणाचा सखोल तपास करत असून, अधिकाऱ्यांकडून आर्थिक व्यवहारांचे तपशील मागवले जात आहेत.

हेही वाचा :

रीलच्या नादात जीव टाकला धोक्यात, महिलेने साडीलाच लावली आग अन् घरभर पळत सुटली अन् Video Viral

इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लंच ब्रेकदरम्यान विद्यार्थिनीवर बलात्कार..

क्रिकेटपटू स्मृती मानधना इंदौरची सून होणार, कोण आहे होणारा नवरा…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *