प्रसिद्ध टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी (serial)एक मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, बबिता, भिडे आणि सोढी यांसारख्या पात्रांनी घराघरांत आपली ओळख निर्माण केली. याच मालिकेत सोढीची भूमिका साकारून घराघरांत प्रसिद्ध झालेला अभिनेता गुरुचरण सिंह आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी वेगळ्या कारणासाठी.गुरुचरण सिंह यांनी आता अभिनय क्षेत्राला रामराम करत बिझनेसच्या दुनियेत पाऊल टाकले आहे. त्यांनी दिल्लीतील प्रेमनगर भागात स्वतःचं ‘चापचं दुकान’ सुरू केलं आहे. सोशल मीडियावर त्यांनी स्वतः ही आनंदाची बातमी शेअर केली असून, त्यांच्या चाहत्यांनीही या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

@sodhi_gcs या त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलद्वारे ते आपल्या नव्या रेस्टॉरंटचं प्रमोशन करत आहेत. त्यांच्या जवळच्या मित्रांनीही सोशल मीडियावरून त्यांच्या या नव्या व्हेंचरची जाहिरात केली आहे. रेस्टॉरंटचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.गुरुचरण सिंह यांचा हा प्रवास मात्र अजिबात सोपा नव्हता. काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘तारक मेहता’ मालिकेतून (serial)ब्रेक घेतल्यानंतर ते आर्थिक आणि मानसिक तणावातून जात होते. एप्रिल 2024 मध्ये ते अचानक बेपत्ता झाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. दिल्लीहून गायब झालेल्या गुरुचरण यांना पोलिसांनी अखेर हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे शोधून काढलं. त्यांनी स्वतः सांगितलं की, “मी त्या काळात मानसिक तणावात होतो आणि कर्जामुळे त्रस्त झालो होतो.”
मात्र, आता त्यांनी आयुष्यात नवी सुरुवात केली आहे. अभिनयाला निरोप देत त्यांनी मेहनतीच्या जोरावर बिझनेसकडे पाऊल टाकलं आहे. गुरूचरण सिंग आता त्यांच्या नव्या उपक्रमात पूर्ण जोमाने लक्ष घालत आहेत आणि नव्या यशासाठी सज्ज झाले आहेत.‘सोढी भाई’ म्हणून ओळखला जाणारा हा कलाकार आता ‘उद्योजक’ म्हणून नवी ओळख निर्माण करत आहे. चाहते म्हणत आहेत — “सोढी आता चापवाला झाला, पण आमचा आवडता राहील तोच!”
हेही वाचा :
2025 च्या शेवटच्या 2 महिन्यांत घडणार मोठा चमत्कार बाबा वेंगांचं ते भाकीत समोर
दिवाळीच्या मुहूर्तावर करा सोन्याची खरेदी! दरात झाली घसरण,
तळ हातांना कायमच घाम येतो?