हातांच्या तळव्यांना वारंवार येणाऱ्या घामामुळे अनेक लोक(hand) त्रस्त आहेत. हातांना सतत येणाऱ्या घामामुळे चिडचिड होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तळहातांना येणाऱ्या घामावर काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

आपल्यातील अनेकांच्या हातांना कायमच घाम येतो. तळहातांना घाम आल्यानंतर कोणतीही वस्तू हातामधून सहज पडून जाते, हात पूर्णपणे चिकट आणि तेलकट होतात. पेन धरताना सुद्धा(hand) अनेक समस्या उद्भवू लागतात. तळ हातांना घाम आल्यानंतर कोणाला हात मिळवताना किंवा एखादी गोष्ट करताना अनेक आत्मविश्वास कमी होऊन जातो. या समस्येला वैद्यकीय भाषेत ‘पामर हायपरहायड्रोसिस’ असे म्हणतात. ही समस्या प्रामुख्याने शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे उद्भवते. याशिवाय जास्त ताण, भीती, चिंता किंवा मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे हातापायांना खूप जास्त घाम येतो. थंडीच्या दिवसांमध्येसुद्धा तुमच्या हातांना वारंवार घाम येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत.
बऱ्याचदा आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे जास्त तेलकट, मसालेदार, शरीरासाठी गरम ठरणारे पदार्थ, कॉफी, चहा किंवा कोल्डड्रिंक इत्यादी पदार्थ शरीरात उष्णता वाढवतात. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे तळव्यांवर आणि शरीराच्या इतर अवयवांवर जास्त घाम येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरोरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि तळव्यांवरील घाम कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यामुळे तात्काळ आराम मिळेल.
तळव्यांवरील घामाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय:
पहिला उपाय म्हणजे हात कायमच कोरडे आणि स्वच्छ ठेवण्यासाठी रुमालाचा वापर करावा. रुमाल किंवा टिश्यू जवळ ठेवून वारंवार हात पुसून घ्यावे. याशिवाय कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर हात साबणाचा किंवा हॅन्ड वॉश करून हात स्वच्छ करावे. याशिवाय दिवसातून दोन ते तीन वेळा हात स्वच्छ करताना थंड पाण्याचा वापर करावा. थंड पाण्याने हात धुतल्यास घामग्रंथी शांत होऊन जातात आणि घाम कमी येतो.
शरीरातील घामाच्या ग्रंथी कमी करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करावा. यासाठी पाण्यात बेकिंग सोडा टाकून काहीवेळ पाण्यात पाय बुडवून ठेवावे. त्यानंतर पाय पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित केल्यास हातापायांना येणारा घाम कमी होईल. याशिवाय हातानं येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळेल. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. चुकीचा आहार घेतल्यामुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात.त्यामुळे आहारात फळे, भाज्या, दही, आणि भरपूर पाणी प्यावे. भरपूर पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर कायमच हायड्रेट राहते. शरीरात वाढलेली उष्णता कमी होते. याशिवाय जेवणात तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे कमीत कमी सेवन करावे.
शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करावे. शरीरात वाढलेल्या मानसिक तणावामुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे ध्यान, श्वसनाचे व्यायाम किंवा फिरायला जाणे इत्यादी गोष्टी नियमित करणे आवश्यक आहे. मन शांत ठेवण्यासाठी योग्य आहार, स्वच्छता आणि मानसिक आरोग्याची जास्त काळजी घ्यावी.
हेही वाचा :
दिवाळीत झकास फोटो काढायचे आहेत?
जपानची एक आगळी-वेगळी पद्धत
टॉप 10 पैकी 7 कंपन्यांनी नोंदवली 2.03 लाख कोटींची वाढ;