आज सर्वत्र दिवाळीचा(Diwali) उत्सव साजरा केला जात आहे. दिवाळीनिमित्त सर्वजण आपल्या कुटुंबीयांना मित्र परिवाराला शुभेच्छा देत असतात. तुम्ही देखील तुमच्या मित्र परिवाराला आणि कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठीस्टिकर्स शोधत आहात का? आता व्हाट्सअपवर तुम्ही मित्रांना, कुटुंबीयांना अनोख्या पद्धतीने दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकतात. सगळ्यात विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अॅपचा वापर करण्याची देखील गरज नाही.

तुम्ही व्हाट्सअपमध्ये स्वतःचे फोटो पोस्ट करून वेगळे स्टिकर तयार करू शकता. स्टिकरच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्रांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकता. या स्टिकर्सवर तुम्ही तुम्हाला हवा असलेला मेसेज देखील लिहू शकता. स्टिकर्स बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि हे स्टिकर बनवण्यासाठी अगदी काही क्षणाचा कालावधी लागतो. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार स्टिकर सेंड करू शकता. यामुळे तुमचे मित्रपरिवार आणि कुटुंबीय नक्कीच खुश होतील.
व्हाट्सअपवर पर्सनलाईझ्ड स्टिकर क्रिएट करण्यासाठी कोणतेही बंधन नाही. व्हाट्सअपमधील कस्टमाईज्ड स्टिकर बनवण्यासाठी युजरना सर्वात आधी चॅट विंडो ओपन करावे लागेल. त्यानंतर स्टिकर सेक्शनमध्ये जाऊन प्लसवर क्लिक करावे लागेल. इथे तुम्हाला तुमचा आवडीचा फोटो ॲड करायचा आहे. यानंतर तुम्ही या स्टिकरवर मेसेज टाईप करू शकता.
ही पद्धत अगदी सोपी आणि सुरक्षित आहे. यामध्ये स्टिकर डायरेक्ट व्हाट्सअपमधून अॅड केले जाऊ शकतात. यामध्ये युजर्सच्या प्रायव्हसीला कोणताही धोका नाही आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अॅपचा वापर करण्याची देखील गरज लागत नाही. तुम्ही तुमच्या मित्रपरिवारआणि कुटुंबीयांसाठी दिवाळी स्टिकर कसे बनवू शकता, याबाबत आता जाणून घेऊया, खरंतर ही प्रोसेस अगदी सोपी आणि सहज आहे.
सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअप ओपन करा आणि तुम्हाला ज्या व्यक्तीला स्टिकर पाठवायचं आहे, त्या व्यक्तीचे चॅट ओपन करा.आता टेक्स्टबॉक्स (Diwali)ओपन करा आणि Emoji आयकॉन वर क्लिक करा.इथे तुम्हाला स्टिकर सेक्शन दिसेल त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर प्लस आयकॉनवर टाईप करा. यानंतर तुम्हाला इथे कॅमेरा आणि गॅलरी असे दोन ऑप्शन पाहायला मिळतील. तुम्हाला ज्या ठिकाणाहून फोटो सिलेक्ट करायचा आहे ते ठिकाण निवडा.
आता पेन्सिल किंवा ड्रॉ ऑप्शन वर क्लिक करा.इथे तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करून त्याला कट क्रॉप किंवा डेकोरेट करू शकता.फोटोवर खास ‘Happy Diwali’ सारखे टेक्स्ट, रंग-बिरंगे डिजाइन किंवा डूडल ऐड करण्याचा ऑप्शन तुम्हाला येथे पाहायला मिळेल.तुमच्या संपूर्ण स्टिकर बनवून पूर्ण झाल्यानंतर सेंड बटनवर क्लिक करा.आता तुम्ही तयार केलेले पर्सनल आणि कस्टमाईज्ड स्टिकर तुम्ही कोणालाही चॅटमध्ये पाठवू शकता आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकता.
खास WhatsApp स्टिकर बनवण्याचे हे आहे फायदे तुम्ही तयार केलेले फोटोचे स्टिकर मेसेजला जास्त परफेक्ट आणि स्पेशल बनवतात.मित्र आणि कुटुंबीयांना हे स्टिकर्स पाठवल्यास त्यांचा हा क्षण अविस्मरणीय आणि स्पेशल अनुभव देणारा ठरतो.पर्सनलाईज्ड व्हाट्सअप स्टिकर्सच्या मदतीने तुमची क्रिएटिव्हिटी दाखवू शकता. जसे की तुम्ही फोटोवर दिवे, रांगोळी किंवा फटाके अॅड करू शकता.
हेही वाचा :
2025 च्या शेवटच्या 2 महिन्यांत घडणार मोठा चमत्कार बाबा वेंगांचं ते भाकीत समोर
दिवाळीच्या मुहूर्तावर करा सोन्याची खरेदी! दरात झाली घसरण,
तळ हातांना कायमच घाम येतो?