बाबा वेंगा — जगप्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवेत्त्या, ज्यांच्या भाकितांचा उल्लेख आजही चर्चेत असतो. 1911 साली बल्गेरियामध्ये जन्मलेल्या आणि 1996 साली निधन पावलेल्या बाबा वेंगा यांनी पुढील 5 हजार वर्षांचं भविष्य(Future) सांगून ठेवलं असल्याचा दावा त्यांच्या अनुयायांकडून केला जातो. त्यांच्या अनेक भाकितांपैकी काही खरे ठरल्याचंही म्हटलं जातं.

आता पुन्हा एकदा त्यांच्या 2025 वर्षासंदर्भातील भविष्यवाण्या चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या मते, 2025 वर्षाचे शेवटचे दोन महिने — नोव्हेंबर आणि डिसेंबर — चार राशींसाठी अतिशय शुभ आणि लकी ठरणार आहेत. या काळात या राशींच्या लोकांना मोठा धनलाभ, नोकरीत पदोन्नती, आणि आयुष्यातील अडचणींवर मात करण्याची संधी मिळणार आहे.
चला जाणून घेऊयात त्या चार भाग्यवान राशी कोणत्या आहेत —
वृषभ रास
या राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवट अत्यंत यशस्वी ठरणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये नशिबाची साथ मिळेल, अडथळे दूर होतील, आणि दीर्घकाळापासून थांबलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत प्रमोशनची शक्यता आहे.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांना अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल, आणि नवीन उत्पन्नाचे मार्ग खुले होतील. करिअरमध्ये प्रगतीचे नवे दरवाजे उघडतील.
सिंह रास
या राशीच्या लोकांच्या हातात पुढच्या दोन महिन्यांत प्रचंड पैसा येण्याची शक्यता आहे. जुनी आर्थिक अडचण संपेल. व्यवसायात नफा होईल आणि नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत.
कुंभ रास
कुंभ राशीसाठीही वर्षाचा शेवट आनंददायक ठरणार(Future) आहे. मोठ्या प्रकल्पात यश मिळेल, नवीन संधी मिळतील आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
हेही वाचा :
दिवाळीत झकास फोटो काढायचे आहेत?
जपानची एक आगळी-वेगळी पद्धत
टॉप 10 पैकी 7 कंपन्यांनी नोंदवली 2.03 लाख कोटींची वाढ;