दिवाळीचा सण अगदी दारात आला असून, घराघरांत फराळाचे सुवास आणि खरेदीची लगबग सुरू आहे. या सणात कपड्यांसोबतच दागिने(jewelry) खरेदी करणे हे अनेकांसाठी शुभ मानले जाते. मात्र, यंदा सोन्याच्या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य खरेदीदारांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या भावात तब्बल विक्रमी वाढ झाल्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी किंमतीत किंचित घसरण झाली. शनिवारी एमसीएक्सवरील डिसेंबर करार 2 टक्क्यांनी घसरून 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 27 हजार 320 रुपये झाला. तर अमेरिकन बाजारात सोन्याचे वायदे 2 टक्क्यांहून अधिक घटून 4,213.30 डॉलर प्रति औंस झाले.

तज्ज्ञांच्या मते, ही घसरण अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे आणि अमेरिका-चीनमधील व्यापारी तणाव कमी झाल्यामुळे झाली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 100% टॅरिफ लादणे टिकाऊ ठरणार नाही असे म्हटल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यातील नफा वसूल करण्यास सुरुवात केली आहे.मात्र, मागील एका वर्षात सोन्याच्या(jewelry) किमतीत तब्बल 70 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता, मध्यवर्ती बँकांची मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी, व्याजदर कपातीच्या अपेक्षा आणि ईटीएफमधील गुंतवणूक वाढ — या सर्व घटकांमुळे सोन्याच्या भावात उसळी आली होती. पण आता परिस्थिती बदलत असून, सोन्याच्या बाजारात दबाव जाणवत आहे.
दरम्यान, प्रसिद्ध भविष्यवेत्त्या बाबा वांगा यांच्या भाकितांच्या आधारे तज्ज्ञांनी 2026 साली सोन्याच्या किमतींबाबत धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार, 2026 मध्ये जागतिक पातळीवर मोठं आर्थिक संकट (‘कॅश क्रश’) येण्याची शक्यता आहे. या संकटामुळे चलन व्यवस्थेत व्यत्यय, बँकिंग क्षेत्रात ताण आणि बाजारातील तरलतेचा अभाव निर्माण होऊ शकतो.अशा परिस्थितीत, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची (jewelry)मागणी प्रचंड वाढू शकते. इतिहास पाहता, आर्थिक मंदीच्या काळात सोन्याच्या भावात 20 ते 50 टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 2026 च्या दिवाळीपर्यंत सोन्याच्या किमती 25 ते 40 टक्क्यांनी वाढू शकतात. याचा अर्थ असा की पुढील दिवाळीपर्यंत 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 62 हजार 500 ते 1 लाख 82 हजार रुपयांदरम्यान पोहोचू शकतो.
सध्या गुंतवणूकदार सोन्यातील नफा घेत असले तरी, पुढील दोन वर्षांत सोनं पुन्हा विक्रमी उंची गाठू शकतं, असा अंदाज आर्थिक विश्लेषक आणि भविष्यवेत्ते व्यक्त करत आहेत. त्यामुळे या दिवाळीत सोनं विकत घेणारे खरेदीदार, दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने मोठा फायदा मिळवू शकतात.
हेही वाचा :
टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, रोहित-विराट फ्लॉप ठरल्यानंतर गावस्करांची मोठी भविष्यवाणी
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार…
यंदा दिवाळीत WhatsApp वर द्या पर्सनलाइज्ड शुभेच्छा! तुमच्या फोटोसह तयार करा अनोखे स्टिकर्स