सोशल मिडियावर दररोज मारामारीचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात.(street) असाच एक व्हिडिओ अलिकडे इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे जो चांगलाच ट्रेंडींग होत आहे. व्हिडिओमध्ये एका मुलीने बांबू हातात घेऊन व्यक्तीची धुलाई करत असल्याचे दिसून येते. व्हिडिओमधील दाव्यानुसार व्यक्ती भररस्त्यात मुलीची छेडछाड करत होता ज्याच्या प्रतिउत्तरात मुलीने थेट बांबू घेऊन त्याची धुलाई करायला सुरुवात केली. देशात छेडछाड आणि बलात्काराचे प्रमाण वाढत असताना मुलीने हिमतीने व्यक्तीला न घाबरत गैरवर्तनाला तोडीस तोड उत्तर दिले जे पाहून यूजर्स खुश झाले. मुलीने उचललेल्या साहसी कृत्यावर आता यूजर्स तिचे मन काैतुक करत आहेत आणि व्हिडिओला चांगलंच शेअरही करत आहेत. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार, सदर घटना उत्तर प्रदेशमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.(street) उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या रस्त्यांवर एका मुलीचा विनयभंग केला जात होता ज्याच्या उत्तरात तिने गप्प न बसता व्यक्तीला त्याची चुकीची अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओमध्ये मुलगी अक्षरश: हातात बांबू घेऊन रस्त्यात व्यक्तीची धुलाई करताना दिसून येते. व्यक्ती तिला रोखण्याचा आतोनात प्रयत्न करतो पण मुलगी इतकी संतापलेली असते की ती त्याला सटासट बांबूचे वार करु लागते. ही घटना हिंसाचाराचे नव्हे तर स्वसंरक्षणाचे आणि धैर्याचे उदाहरण देते.जेव्हा मुलाने मुलीवर लैंगिक अत्याचार केला तेव्हा घाबरण्याऐवजी मुलीने धाडसाने स्वतःचा बचाव केला पाहिजे. संधी साधून तिने मुलाला पकडले आणि पुन्हा असे कृत्य करू नये म्हणून काठीने मारहाण केली पाहिजे.
लखनऊ में मनचले को मिला तुरंत जवाब 🚨
— KUNDAN PATEL (@KUNDAN00PATEL) January 28, 2026
एक लड़का लड़की से छेड़छाड़ कर रहा था..
लड़की ने डरने की बजाय…
खुद का बचाव करते हुए विरोध किया..
यह हिंसा नहीं,आत्मरक्षा और हिम्मत की मिसाल है
सवाल यही है…
क्या अब भी चुप रहना ही सही माना जाएगा.. pic.twitter.com/tNVS4uTUV7
घटनेचा व्हायरल व्हिडिओ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. (street)व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जी मुलगी घाबरली नाही, जिने प्रतिकार केला, ती केवळ स्वतःलाच वाचवत नव्हती; तर अनेक वर्षांपासून गप्प राहण्यास सांगितलेल्या प्रत्येक मुलीचा ती आवाज बनत होती.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही अनेक मुलींसाठी तातडीने कृती करण्याची प्रेरणा आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हिने तर मर्दानी चित्रपटाचा सीन सत्यात करुन दाखवला”.
हेही वाचा :
या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते
सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका