सोशल मिडियावर नेहमीच अनेक मजेदार आणि रंजक व्हिडिओज शेअर केले जातात.(rushed)हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात, भावूक करतात तर कधी थक्क करुन जातात. इथे बऱ्याचदा लग्नाचेही अनेक व्हिडिओज शेअर केले जातात. असाच एक व्हिडिओ अलिकडे शेअर करण्यात आला असून तो सोशल मिडियावर सर्वांनाच हसू अनावर करत आहे. आजकाल जोडपे फक्त विधींनाच महत्त्व देत नाही तर चांगल्या फोटोज आणि व्हिडिओसाठी एकमेकांना मिठी मारणं, किस करणं अशा गोष्टींनाही अधिक प्राधान्य देतात. अशाच नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडताना दिसले. वधू आणि वर पोज देत एकमेकांकडे प्रेमळ नजरेने पाहतात आणि किस करणार तितक्यात तिथे भटजींची एंट्री होते. ते रागातच दोघांकडे बघतात ज्यामुळे जोडप्याचा प्लॅन फ्लाॅप होतो आणि उर्वरित सर्व मंडळींना हसू अनावर होते.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला लग्नसमारंभातील काही (rushed)दृश्ये दिसून येतात. सर्व मंडळी जमलेली असतात आणि यावेळीच वधूची एंट्री होते. वधू लाला रंगाचा सुंदर लेहंगा घालून पुढे चालत येते. वर पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करतो आणि दोघेही मंडपात सर्व वऱ्हाड्यांसमोर उभे राहतात. ते एकमेकांना मिठी मारतात आणि वर वधूला किस करायला जाणार तितक्यातच तिथे आपल्याला भटजींची एंट्री झाल्याचे दिसून येते. ते धावत पळत रागातच वर आणि वधूच्या जवळ जातात आणि दोघांना एकमेकांपासून दूर करतात. हिंदू धर्मानुसार वर-वधूने लग्नआधी असे एकत्र येणे, चुंबन करणे योग्य मानले जात नाही आणि म्हणूनच भटजी त्यांच्या अशा वागण्यावर आपला आक्षेप व्यक्त करता. हे दृश्य पाहायला फार रंजक आणि विनोदी वाटते ज्यामुळे वऱ्हाड्यांसह यूजर्सना ते पाहून आपले हसू थांबवता येत नाही.

दरम्यान ल्ग्नाचा हा व्हिडिओ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. (rushed)व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सार्वजनिक ठिकाणी जोडप्याने चुंबन घेणे वाईट आहे का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “माझ्या गावात एका वराला स्टेजवर त्याच्या वधूचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याला खूप मारहाण करण्यात आली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पंडितजी म्हणत असतील, हे सगळं लग्नाच्या नंतर करा”.

हेही वाचा :

तर सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री? मोठं भाकित समोर!

स्वप्नात वारंवार मृतदेह दिसणे म्हणजे मोठ्या संकटाची चाहूल, अजिबात करू नका दुर्लक्ष अन्यथा…

कोहलीवर हल्ला? आर अश्विनने तात्काळ विराटला लावला फोन, काय आहे प्रकरण?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *