बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, ज्यात पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृत्यू विजेचा धक्का बसल्याचे(death) भासवण्याचा प्रयत्न केला. पोलिस तपासात सत्य समोर आल्यानंतर आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. २५ वर्षीय प्रशांत कुमार हा इलेक्ट्रिशियन असून, तो बल्लारी जिल्ह्यातील हुविना हडगली येथील रहिवासी आहे. मृत पत्नी रेश्मा हिचे वय ३२ वर्षे असून, तिच्या पहिल्या पतीचे निधन आजाराने झाले होते. दोघांना १५ वर्षांची मुलगी आहे.

रेश्माची आणि प्रशांतची ओळख नऊ महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर झाली होती आणि लवकरच त्यांनी लग्न केले. मात्र, लग्नानंतर प्रशांतला रेश्माच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला आणि वारंवार दोघांमध्ये वाद व्हायचा. १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या तीव्र वादाच्या वेळी प्रशांतने रेश्माचा गळा दाबून तिचा खून (death)केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह बाथरूममध्ये ठेवून, पाण्याच्या बादलीत हीटर सुरू करून विजेचा अपघात झाल्याचा बनाव केला.
सायंकाळी मुलगी शाळेतून परतल्यावर तिला आई बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडली. स्थानिकांच्या मदतीने रेश्माला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सुरुवातीला प्रशांतने विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा दावा केला, परंतु पोलिसांच्या चौकशीत त्याने अखेर खुनाची कबुली दिली. पोलिसांनी प्रशांतविरुद्ध हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा :
पतीसमोरच 7 जणांकडून गँगरेप, अन्… पुढे जे घडलं ते धक्कादायक…
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती…
शनिवारवाड्यातील नमाज पठनामुळे पुण्यातील वातावरण तापलं! मेधा कुलकर्णींकडून हाती भगवा घेत शुद्धीकरण