पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा यांच्या मुलगा अकील अख्तर याच्या संशयास्पद मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (police)अकीलचे वडील, आई (माजी मंत्री) आणि बहिणीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पंचकुला पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेच्या आधी अकीलचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यात त्याने कुटुंबीयांविरुद्ध धक्कादायक आरोप केले होते.

अकील अख्तर हा पंजाब आणि हरियाणाच्या हायकोर्टात वकिली करत होता. 27 ऑगस्टला रेकॉर्ड केलेल्या पहिल्या व्हिडीओमध्ये त्याने म्हटलं होतं की, “माझ्या पत्नीचे आणि माझ्या वडिलांचे संबंध आहेत. 2018 मध्ये मी दोघांना बाथरूममध्ये पकडलं होतं. त्याच दिवशी माझ्यावर खोटी केस दाखल केली गेली.” त्याने पुढे सांगितलं की, “माझी आई आणि बहीण माझा बंदोबस्त करण्याचा कट रचत होत्या. मला ठार मारण्याचा प्लान बनवला गेला होता.”
याच व्हिडीओमध्ये अकीलने आपल्या(police) बहिणीवर आणि पत्नीवरही गंभीर आरोप केले. त्याने म्हटलं की, “माझी बहीण घरातून पळून गेली होती आणि वेश्या व्यवसायाशी संबंधित होती. माझ्या पत्नीचा आणि वडिलांचा संबंध आमच्या लग्नापूर्वीच सुरू होता. माझ्या लग्नाचा अर्थ नव्हता, कारण ती प्रत्यक्षात माझ्या वडिलांशी जोडलेली होती.”
त्याने आणखी सांगितले की, त्याचे अपहरण करून त्याला रिहॅब सेंटरमध्ये ठेवण्यात आले आणि त्यावर मानसिक आजाराचे खोटे लेबल लावण्यात आले. “मी कोणतीही नशा करत नाही, पण माझ्या वडिलांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून मला अडचणीत आणले,” असे अकीलने स्पष्ट केले.दरम्यान, दुसऱ्या व्हिडीओमध्ये अकीलने आपले पूर्वीचे विधान मागे घेतले आणि कुटुंबाची माफी मागितली. “मी मानसिक तणावाखाली होतो. माझ्या आई-वडिलांनी माझी काळजी घेतली. मला एवढं चांगलं कुटुंब मिळालं हे माझं भाग्य आहे,” असे तो म्हणताना दिसतो.

या दोन परस्परविरोधी व्हिडीओंनंतर काही दिवसांनी अकीलचा मृतदेह सापडला. पोलिसांनी संशयित मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अकीलचा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या, याचा तपास पंचकुला पोलिसांकडून सुरू आहे.
हेही वाचा :
20व्या वर्षी यू मुम्बाच्या खेळाडूचं अचानक निधन, तर 23 वर्षाच्या असिस्टंट मॅनेजरचाही मृत्यू..
शिल्पा शेट्टीचे ‘हे’ रेस्टॉरंट आहे कुबेराचा खजिना, एका दिवसाची कमाई 3 कोटी..
WhatsApp-Instagram चॅटिंग आता होणार आणखी सुरक्षित…