प्रो कबड्डी लीग च्या चाहत्यांसाठी या दिवाळीत अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. जयपूर पिंक पँथर्सचे असिस्टंट मॅनेजर वेदांत देवाडिगा यांच्या 23व्या वर्षी झालेल्या निधनानंतर आता यू मुंबा संघाचा युवा खेळाडू ए. बाला भारती याचं वयाच्या फक्त 20व्या वर्षी आकस्मिक निधन झालं आहे. प्रो कबड्डीशी(Kabaddi) संबंधित दोन तरुण सदस्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.

जयपूर पिंक पँथर्सने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत वेदांत देवाडिगाच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. टीमने लिहिलं, “वेदांत आमच्या कुटुंबाचा अतिशय प्रिय भाग होते. त्यांचं समर्पण आणि सकारात्मक ऊर्जा आम्हाला नेहमी आठवेल. या कठीण काळात आमच्या भावना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत.” त्याचप्रमाणे यू मुंबा संघानेही बाला भारतीच्या अचानक झालेल्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. संघाने म्हटलं की, “आमच्या युवा खेळाडू बाला भारती यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने आम्ही सर्वजण स्तब्ध आहोत. आमच्या भावना त्यांच्या कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांसोबत आहेत.”

बाला भारती प्रो कबड्डीमध्ये एक उभरता खेळाडू म्हणून ओळखला जात होता. त्याचा खेळातील आत्मविश्वास, मेहनत आणि चाहत्यांवर निर्माण झालेला प्रभाव लवकरच सर्वांच्या लक्षात आला होता. कबड्डीच्या मैदानावर त्याच्या चपळ हालचाली आणि खेळातील आक्रमकता यामुळे तो भविष्यात मोठं नाव कमावेल अशी अपेक्षा होती. पण त्याच्या अचानक जाण्याने केवळ यू मुंबाच नाही, तर संपूर्ण प्रो कबड्डी लीग आणि कबड्डी फॅन्समध्ये मोठं दुःख पसरलं आहे.

या दुर्दैवी घटनांनी आनंदाच्या दिवाळी सणावर दुःखाची सावली पसरवली आहे. दोन्ही संघांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या दुःखद घटनांची माहिती दिली(Kabaddi) आणि श्रद्धांजली व्यक्त केली. वेदांत देवाडिगा आणि ए. बाला भारती या दोन्ही तरुण प्रतिभावान खेळाडूंच्या आकस्मिक मृत्यूने भारतीय क्रीडा क्षेत्राला मोठं नुकसान झालं आहे.
हेही वाचा :
शिल्पा शेट्टीचे ‘हे’ रेस्टॉरंट आहे कुबेराचा खजिना, एका दिवसाची कमाई 3 कोटी..
WhatsApp-Instagram चॅटिंग आता होणार आणखी सुरक्षित…
खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहिणींसाठी खास ओवाळणी…